Nashik Accident Saam Tv
महाराष्ट्र

Accident: आनंदावर विरजन! लग्नाला जाताना समृद्धी महामार्गावर कार उलटली; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू,अपघातापूर्वीचा VIDEO समोर

Nashik Accident: नाशिकमध्ये भयंकर अपघाताची घटना घडली. समृद्धी महामार्गावर कारचा टायर फुटून अपघात झाला. या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू तर अनेक जण गंभीर जखमी झाले. अपघातापूर्वीचा त्यांचा कारमध्ये मजामस्ती करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.

Priya More

Summary -

  • लग्नासाठी जात असताना समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

  • टायर फुटल्याने कार महामार्गावर उलटली

  • अपघातामध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू

  • लहान मुलांसह अनेक जण गंभीर जखमी झाले

  • अपघातापूर्वीचा या सर्वांचा कारमध्ये मजामस्ती करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे

समृद्धी महामार्गावर भयंकर अपघाताची घटना घडली. भरधाव कारचा टायर फुटल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले. ही घटना नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील पाटोळे येथे समृद्धी महामार्गावर घडली. अपघातामध्ये जखमी झालेल्यांमध्ये अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींमध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे. अपघातातील मृत आणि जखमी हे कल्याणमध्ये राहणारे आहेत. अपघातापूर्वीचा त्यांचा व्हिडीओ समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेच्या चिंचपाडा येथे राहणारे ११ जण कारने लग्नासाठी गेले होते. समृद्धी महामार्गावरून हे सर्वजण जात होते. त्याचवेळी सिन्नर तालुक्यातील पाटोळे शिवाराजवळ त्यांच्या कारचा टायर फुटला. कारचा वेग जात होता त्यातच टायर फुटल्यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या कडेला उलटली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला. कारमधील तिघांनी जागीच प्राण सोडले. अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवले.

या अपघातामध्ये निलेश बुकाणे, त्यांची सख्खी बहीण वैशाली सचिन घुसळे आणि बायको छाया बुकाणे यांचा मृत्यू झाला. तर या अपघातामध्ये सचिन घुसळे (४० वर्षे), साची सचिन घुसळे (९ वर्षे), अर्णव निलेश बुकाणे (१४ वर्षे), गोल्डी निलेश बुकाणे (१० वर्षे), सुयश घुसळे (३ वर्षे), निरव गायकवाड (१० वर्षे), मनस्वी गायकवाड (५ वर्षे) हे सर्वजण गंभीर जखमी झाले आहेत. तर कारचा चालक प्रशांत शिरसाट (३२ वर्षे) हा देखील किरकोळ जखमी झाला आहे. जखमींना उपचारासाठी सिन्नर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर गंभीर जखमी असलेल्या तिघांना पुढील उपचारासाठी नाशिकला हलवण्यात आले.

या अपघातापूर्वीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये बुकाणे आणि घुसळे कुटुंबीय आनंदी दिसत होते. लग्नासाठी एकत्रित निघाले असता कारमध्ये मजामस्ती करतानाचा एका व्हिडीओ एकाने सोशल मीडियावर शेअर केला होता. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण प्रचंड आनंदी दिसत होते. पण या आनंदावर विरजन पडेल असे त्यांना स्वप्नातही वाटले नसेल. काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं आणि भयंकर अपघात झाला. या घटनेमुळे बुकाणे आणि घुसळे कुटुंबीयांच्या नातेवाईकांना धक्का बसला. जखमींवर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयाबाहेर नातेवाईकांनी मोठी गर्दी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राज्यातील सर्वाधिक थंडी पूर्ण शहरात, पारा ९.५ अंशावर

Yoga Time: योगा कधी करावा? सकाळी की संध्याकाळी? जाणून घ्या योगासनांची योग्य वेळ

Ladki Bahin Yojana: ४ दिवसात लाडकीच्या खात्यात खटाखट ₹ ३००० येणार, बड्या मंत्र्यांची घोषणा

Success Story: कौतुकास्पद! IPS ट्रेनिंगदरम्यान झाले IAS; एकदा नव्हे तर दोनदा UPSC क्रॅक; ऋत्विक वर्मा यांचा प्रेरणादायी प्रवास

Todays Horoscope: या राशींच्या व्यक्तींच्या आज आर्थिक समस्या सहज दूर होतील; जाणून घ्या राशीभविष्य

SCROLL FOR NEXT