Accident News Saam TV
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhajinagar News : आई-मुलाची भेट अपूर्णच राहिली; मुलाची वाट पाहत उभ्या असलेल्या महिलेला ट्रकने चिरडलं

Chhatrapati Sambhajinagar : पुष्पाबाई वामनराव जगताप असं मृत महिलेचं नाव आहे

डॉ. माधव सावरगावे

Chhatrapati Sambhajinagar Accident News :

छत्रपती संभाजीनगर येथून मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. मुलाच्या भेटीसाठी २५० किमीचं अंतर कापून छत्रपती संभाजीनगर गाठलेल्या महिलेचा भेटीआधीच अपघाती मृत्यू झाला आहे. शहराजवळील केंब्रिज चौकात ही घटना घडली आहे.

पुष्पाबाई वामनराव जगताप असं मृत महिलेचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रिव्हर्स घेताना ट्रकने महिलेला चिरडलं आहे. पोलीस कारवाई करणार असल्याच्या धाकाने ड्रायव्हरने ट्रक रिव्हर्स घेतला. यावेळी पुष्पाबाई मागे उभ्या होत्या. त्यांचा मागच्या चाकाखाली आल्याने मुलासमोरच मृत्यू झाला.(Latest News)

या घटनेत ट्रक चालक निंगराज मलप्पा बिस्मोंडे याच्याविरोधात एमआयडीसी सिडको पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोला येथून मुलाला भेटण्यासाठी पुष्पाबाई शहरात आल्या होत्या.

मुलगा घ्यायला येत असल्याने बसमधून उतरल्यावर त्या वाट पाहत रस्त्याच्या बाजूला उभ्या होत्या. दरम्यान घ्यायला आलेल्या मुलाने आईचा मृतदेह पाहताच हंबरडा फोडला. घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उमेदवारांनो सावध राहा! खबरदारीने निर्णय घ्यावे लागेल; ५ राशींचे लोकांच्या कायदेशीर अडचणी वाढण्याची शक्यता

मुंबई महापालिका निवडणुकीत PADU मशिन, आयोगाच्या नव्या मशीनवर ठाकरेंचा आक्षेप, PADU मशीन नेमकं कशासाठी?

Maharashtra Live News Update: नागपुरात चंद्रपुरात जाणारी दारुची गाडी पकडली

Haldi Kumkum affordable gift: स्वस्तात मस्त...अगदी १० रूपयांपासून हळदी-कुंकुच्या वाणामध्ये देऊ शकता या गोष्टी

शिंदेंच्या शिवसेना उमेदवारानं मंडळाच्या तरुणांना मारहाण केल्याचा आरोप; पोलिसांशीही घातली हुज्जत

SCROLL FOR NEXT