Mumbai-Pune News: पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर पुढील १० दिवस टप्याटप्याने असतील ब्लॉक; जाणून घ्या वेळ आणि तारखा

Mumbai-Pune News: मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर पुढील १० दिवस ब्लॉक घेण्यात येणार आहे.
Mumbai-Pune News
Mumbai-Pune NewsSaam Tv (Social Media)
Published On

(दिलीप कांबळे )

Mumbai-Pune News:

मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या मार्गांवर पुढील १० दिवस ब्लॉक घेण्यात येणार आहे. मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम केले जात आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत हे काम करण्यात येत आहे. या कामासाठी १७ ते १९ आणि २६ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ ते १ या वेळेत द्रुतगती मार्गाच्या मुंबई आणि पुणे वाहिनीवर वाहतूक पूर्णत: बंद राहणार आहे. याविषयीची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिलीय. (Latest News)

या द्रुतगती मार्गावर 17 ऑक्टोबर रोजी पुणे वाहिनीवरील खंडाळा बोगद्याजवळ ४७ / ९०० कि.मी आणि लोणावळा बोगद्याजवळ ५० /१००येथे ग्रॅन्ट्रीचे काम सुरु करण्यात येणार आहे. तर १८ ऑक्टोबर रोजी लोणावळा कि.मी. ५०/१०० येथे मुंबई वाहिनीवरील दस्तुरी पोलीस चौकी कि.मी. ४४/८०० व खालापूर कि.मी. ३३/८०० ग्रॅटीचे काम केले जाणार आहे.

तर १९ ऑक्टोबर रोजी ढेकू गाव कि.मी. ३७/८०० व कि.मी. ३७ काम केले जाणार आहे. याचबरोबर २६ ऑक्टोबर रोजी खंडाळा बोगदा कि.मी. ४७/१२० तर खोपोली एक्झिट कि.मी. ३९/९०० वर गॅन्ट्री उभारण्याचे काम सुरू राहणार आहे. काम पूर्ण झाल्यावर दुपारी १ वाजता सदर वाहिनीवरील वाहतूक पुन्हा सुरु करण्यात येईल.

याआधी देखील घेण्यात आला होता ब्लॉक

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर १० ऑक्टोबर रोजी ब्लॉक घेण्यात आला होता. एक्स्प्रेस वेवर मोठे दिशादर्शक फलक बसवण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात आला. दुपारी १२ ते २ या कालावधीमध्ये हा ब्लॉक घेण्यात आला. त्यामुळे या काळामध्ये मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक ही पूर्णपणे ठप्प झाली होती. १५ ऑक्टोबर रोजीही या . मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ब्लॉक घेण्यात आला होता. दुपारी १२ ते १ च्या दरम्यान हा ब्लॉक घेण्यात आला होता.

Mumbai-Pune News
Mumbai Pune Expressway: प्रवाशांनो लक्ष द्या! मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर विशेष ब्लॉक, वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग कोणते?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com