कंधारच्या आठवडी बाजारात भिषण अपघात; ब्रेक फेल झाल्याने टेम्पो थेट बाजारात Saam Tv
महाराष्ट्र

कंधारच्या आठवडी बाजारात भिषण अपघात; ब्रेक फेल झाल्याने टेम्पो थेट बाजारात

दोनजण ठार, तर 16 जण गंभीर जखमी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नांदेड - कंधारच्या Kandhar आठवडी बाजारात भिषण अपघात Accident झाला आहे. ब्रेक फेल Break Fail झाल्याने टेम्पो Tempo थेट बाजारात घुसला आहे. जिल्ह्यात आठवडी बाजारात भरधाव टेम्पो घुसून झालेल्या अपघातात दोनजण ठार, तर 16 जण गंभीर जखमी झाले आहेत. कंधार येथील महाराणा प्रताप चौकात काल सायंकाळी हा भिषण अपघात झाला आहे.

हे देखील पहा -

विटकरीने भरलेला टेम्पो बाजारपेठेत अचानक घुसला आणि बाजारासाठी आलेल्या लोकांना काही कळणाच्या आतच टेम्पोने अनेकांना उडवले आणि त्यानानंतर सर्वत्र धावपळ सुरू झाली. या अपघातात पती आणि पत्नी दोघे ठार झाल्याची माहिती आहे. तर सोळाजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी पोलीस आणि अँब्युलन्सला पाचारण केले.

त्यानंतर जखमींना सुरवातीला कंधारच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. अपघात भर चौकात झाल्याने आणि बाजाराचा दिवस असल्याने नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. जेसीबीच्या सहाय्याने टेम्पो बाजूला करण्यात आले. ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती असून अपघात होताच टेम्पो चालक फरार झाला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

SCROLL FOR NEXT