Beed Temple Land Scam  Saam TV
महाराष्ट्र

देवस्थान जमीन घोटाळ्यातील थंडावलेल्या कारवाईला वेग; फौजदारी गुन्हे दाखल होणार?

Saam Impact...अन्यथा तपास सीआयडीकडे सोपविणार - नरहरी झिरवाळ

विनोद जिरे

बीड जिल्ह्यात (Beed District) देवस्थान आणि वक्फ बोर्डच्या जमिनींवर डल्ला मारण्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. याविषयी साम टीव्हीने देवाच्या जमीनीचे चोर कोण? देवस्थानच्या जमिनीवर डल्ला? यासह विविध बातम्यांमधून हा खळबळजनक प्रकार समोर आणला होता. तर या प्रकरणात थंडावलेल्या कारवाईत आता, फौजदारी गुन्हे दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याविषयी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी, बीड जिल्हा प्रशासनाला थेट गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनातील कार्यालयात काल 25 मे रोजी, राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळुंके, आमदार संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्यासह इतर काही अधिकाऱ्यांसमवेत बैठक पार पडली. या बैठकीत उपाध्यक्षांनी जिल्हा प्रशासनाला झापत प्रशासन घोटाळेबाजांवर कारवाई करत नसल्याचा ठपका ठेवला आहे. जिल्हा प्रशासनाने नोडल अधिकारी नियुक्ती करून घोटाळेखोरांवर थेट गुन्हे दाखल करावेत, असे निर्देश यावेळी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अन्यथा हा तपास सीआयडीकडे सोपविण्यात येईल अशी देखील तंबी दिल्याचं सूत्रांनी म्हटलंय. तर यावर दोन दिवसात महसुल विभागाकडून गुन्हे दाखल करण्यासाठी अधिकारी प्राधिकृत केला जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असल्याचं सूत्रांनी म्हटलंय. यामुळे आता बीड जिल्ह्यातील देवस्थान आणि इनामी जमीन घोटाळ्यातील कारवायांना पुन्हा एकदा वेग येण्याची शक्यता वर्तविली जात असून कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज यांच्या गाडीत उद्धव ठाकरे, दुसऱ्या गाडीत आदित्य-अमित ठाकरे; दीपोत्सवात ठाकरे बंधू पुन्हा एकत्र|VIDEO

Maharashtra Live News Update: मनसेच्या दिपोत्सवाला जाताना ठाकरे बंधूंचा एकाच कारमधून प्रवास

Raj Thackeray :...अन् राज ठाकरेंनी स्वत: हाती घेतलं कारचं 'स्टीअरिंग', दीपोत्सवातील ठाकरे बंधूंचा 'तो' व्हिडिओ चर्चेत

Saturday Horoscope: धनत्रयोदशीला 4 राशींचे भाग्य उजळणार, कामाच्या ठिकाणी बढतीचे योग, वाचा शनिवारचे राशीभविष्य

धक्कादायक! आणखी एका पोलीस कर्मचाऱ्यानं आयुष्य संपवलं, १० दिवसात ३ पोलिसांची आत्महत्या

SCROLL FOR NEXT