मोठी बातमी! मंत्री अनिल परबांवर ईडीची धाड; ७ ठिकाणी छापेमारी

ED Raids On Minister Anil Parab : अनिल परब यांच्या खासगी निवासस्थान, शासकीय निवासस्थानासह पुणे, दापोली आणि मुंबई अशी एकुण ७ ठिकाणी कारवाई सुरु आहे.
ED Raids On Minister Anil Parab, Anil Parab News, Kirit Somaiya News
ED Raids On Minister Anil Parab, Anil Parab News, Kirit Somaiya NewsSaam Tv
Published On

मुंबई: राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्याशी संबंधीत सात विविध ठिकाणी ईडीने आज (गुरुवार) सकाळी छापेमारी (ED Raid) सुरु केली आहे. मनी लॉन्ड्रींग प्रकरणी ही छापेमारी सुरु आहे. काही दिवसांपूर्वी सीआरझेडचे उल्लंघन करत हे रिसॉर्ट बांधल्याचा दावा करत भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केंद्रीय तपास यंत्रणेकडे तक्रार केली होती. त्यानंतरच ईडीने ही कारवाई केल्याचे दिसत आहे. (ED Raids On Minister Anil Parab)

हे देखील पाहा

मंत्री अनिल परब यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी सकाळी ७ वाजल्यापासून ईडीची रेड सुरू आहे. अनिल परब यांच्या खासगी निवासस्थान, शासकीय निवासस्थानासह पुणे, दापोली आणि मुंबई अशी एकुण ७ ठिकाणी कारवाई सुरु आहे. जवळपास ४ अधिकाऱ्यांकडून ही कारवाई सुरू आहे.

किरीट सोमय्यांनी केली होती तक्रार

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेते तथा राज्याचे परिवहन मंत्री यांच्या विरोधात केंद्रीय तपास यंत्रणेकडे तक्रार दाखल केली होती. सोमय्या म्हणाले की, "बेनामी मालमत्ता, मनी लाँड्रिंग, शेल कंपन्या, पर्यावरण मंत्रालय, FEMA उल्लंघनासाठी ठाकरे सरकारच्या घोटाळेबाजांवर कठोर कारवाईची अपेक्षा आहे असं सोमय्या म्हणाले. तसेच अनिल परब, यशवंत जाधव, हसन मुश्रीफ, कंपनी, मंत्रालय ROC यांची आयकर विभाग, पर्यावरण मंत्रालय, ED, FEMA द्वारा चौकशी करुन कारवाई केली जावी असंही सोमय्या म्हणाले आहेत. यशवंत जाधव यांच्या दुबई कनेक्शनचीही ईडीने चौकशी केली अशी माहिती सोमय्यांनी दिली.

ED Raids On Minister Anil Parab, Anil Parab News, Kirit Somaiya News
माझ्या पत्नीचा मला अभिमान; चंद्रकांत पाटलांच्या टीकेला सदानंद सुळेंचं चोख प्रत्युत्तर

अनिल परब बॅग तयार ठेवा : सोमय्या

अनिल परबांवर ईडीच्या धाडीनंतर किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांना डिवचलं आहे. अनिल देशमुख, नवाब मलिक तुरुंगात आहेत, आता अनिल परब यांनी कपड्यांची बॅग भरून ठेवावी असा इशारा त्यांनी अनिल परब यांना दिला आहे.

काय आहे अनिल परबांचे साई रिसॉर्ट प्रकरण?

पर्यावरण मंत्रालय भारत सरकार यांनी ३१ जानेवारी २०२२ ला रत्नागिरीच्या दापोली येथील साई रिसॉर्ट एन एक्स आणि सी कोच हे अनधिकृत असून तोडण्याचे आदेश दिले होते. ९० दिवसांमध्ये रिसॉर्ट मालक किंवा प्रशासनाने हे दोन्ही रिसॉर्ट तोडायचे होते. मात्र, ९० दिवस पूर्ण झाले असून अजूनही रिसॉर्ट पाडण्यात आले नाही.

तपास अधिकारी कोण?

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या १०० कोटी वसूली प्रकरणाची चौकशी करणारे तपास अधिकारी कासिम सुलतान हे अनिल परब यांची चौकशी करत आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com