- रणजित माजगावकर
Shirol News : कोल्हापूर (kolhapur) जिल्ह्यातील शिरोळ पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना (shirol muncipal council) पावणे दाेन लाख रुपयांच्या लाच प्रकरणी लाचलुचपत विभागाने पकडले आहे. अभिजीत मारुती हराळे (chief officer abhijeet harale) असे मुख्याधिका-याचे नाव आहे. एसीबीने (acb) हराळेसह चाैघांना ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणाबाबत मिळालेल्या माहितीनूसार तक्रारदार यांचे बांधकाम परवाना फाईल तपासुन पुढे पाठविण्यासाठी कनिष्ठ अभियंता संकेत हंगरगेकर आणि लिपक सचिन सावंत यांनी तक्रारदार यांचेकडे एक लाख रुपये लाचेची मागणी केली. मुख्याधिकारी अभिजीत हराळे यांनी तक्रारदार याची फाईल मंजूर करून बांधकाम परवाना देणेसाठी 75 हजार रुपयांची लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदार यांने कोल्हापूर एसीबीकडे धाव घेत तक्रार केली.
एसबीने तक्रारीची पडताळणी करुन सापळा रचला. त्यानूसार या सपाळ्यात अभिजीत हराळे, संकेत हंगरगेकर, सचिन सावंत आणि अमित संकपाळ हे अडकले. तक्रारदार यांच्याकडून 1 लाख 75 हजार रुपये लाच घेतल्याने चाैघांना ताब्यात घेण्यात आले. (Breaking Marathi News)
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार या प्रकरणी अभिजीत मारुती हराळे (वय 33) मुख्याधिकारी, शिरोळ नगरपरिषद शिरोळ, जि. कोल्हापूर सद्या रा.शिरोळ, जि. कोल्हापूर, मुळ रा.भिलवडी, ता.पलूस, जि. सांगली) , संकेत हणमंत हंगरगेकर (वय 28), कनिष्ठ अभियंता, शिरोळ नगरपरिषद, सद्या रा. जयसिंगपूर, ता.शिरोळ मूळ रा.उस्मानाबाद, जि. उस्मानाबाद), सचिन तुकाराम सावंत लिपिक शिरोळ नगरपरिषद रा.शिरोळ, जि. कोल्हापूर, अमित तानाजी संकपाळ (वय 42) (खाजगी इसम, रा. शिरोळ,जि. कोल्हापूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.