Nanded : अकोला- हैदराबाद महामार्गावर तिहेरी अपघात, कारचा चूराडा... रस्त्यावर रक्ताचा सडा; नांदेडसह साेलापूरातील एक ठार, आठ जखमी

Akola-Hyderabad Highway Accident: मन सुन्न करणाऱ्या या विचित्र अपघातामुळे नांदेड जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
nanded accident news
nanded accident newssaam tv
Published On

Nanded Accident News : अकोला - हैदराबाद महामार्गावर (akola hyderabad highway) तीन वाहनांचा विचित्र अपघात (accident) झाला आहे. नांदेडच्या (nanded latest news) दाभड जवळ मध्यरात्री झालेल्या अपघातात दोन जण ठार तर आठ जण जखमी झाले आहेत. दरम्यान या प्रकरणी कार चालका विरोधात अर्धापूर पोलिस ठाण्यात (ardhapur police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

nanded accident news
HSC Exam 2023 : महाराष्ट्राची काॅपी जत्रा... बारावीच्या विद्यार्थ्यांना 'या' परीक्षा केंद्रावर काॅपीचे झाले वाटप (पाहा व्हिडिओ)

या घटनेत कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सूटल्याने कार महामार्गावरील दुभाजकावरुन समोरुन येणाऱ्या टेम्पोला धडक दिली. त्यामुळे टेम्पोने दुसऱ्या कारला धडक दिली. या तीन वाहनांच्या झालेल्या अपघातात नांदेड मधील अमित घुगे या तरुणाचा तर रामा प्रल्हाद डोंगरे या सोलापूर जिल्ह्यातील व्यक्तीचा मृत्यू झाला.

या घटनेतील अपघातग्रस्तांना माेठा धक्का बसला आहे. या अपघातात आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींना महामार्ग पोलिसांनी नांदेड येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. (Maharashtra News)

nanded accident news
Viral Video : चालत्या बसमध्ये वकीलाच्या बायकोचा धिंगाणा, पाेलिसांत गुन्हा दाखल (पाहा व्हिडिओ)

या अपघातात जखमी झालेल्यांची नावे असे - स्वप्निल पाटील, अभिजित शिरफुले, साईनाथ मुळे, नजमा बेगम, सय्यद अहेमद, नाहीद बेगम, जैनब सय्यद, सय्यद अयान राफे. साखर झोपेत असताना झालेल्या विचित्र अपघातातील घटनास्थळावर कारचा अक्षरशः चुराडा झालाय तर रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता.

मन सुन्न करणाऱ्या या विचित्र अपघातामुळे नांदेड जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान या प्रकरणी कार चालका विरोधात अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com