CET परीक्षा देण्यासाठी जात असलेले 150 ते 200 विद्यार्थी पुरामुळे अडकले
CET परीक्षा देण्यासाठी जात असलेले 150 ते 200 विद्यार्थी पुरामुळे अडकले दीपक क्षीरसागर
महाराष्ट्र

CET परीक्षा देण्यासाठी जात असलेले 150 ते 200 विद्यार्थी पुरामुळे अडकले

दीपक क्षीरसागर

लातूर: वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेली MHTCET परीक्षा देण्यासाठी जात असताना पुरामुळे अनेक विद्यार्थी अडकुन पडले आहेत. लातूर, नांदेड जिल्ह्यातील किमान 150 ते 200 विद्यार्थी लातूर तालुक्यातील भातखेडा येथील पुलावर मांजरा नदीचे पाणी आल्याने अडकुन पडले आहेत. रात्री 11 वाजल्यापासून वाहतूक बंद करण्यात आली असल्याने अंदाजे 70 ते 80 वाहने लातूर नांदेड महामार्गावर अडकून पडली आहेत. (About 150 to 200 students on their way to the CET exams were stranded by the floods)

हे देखील पहा -

मांजरा नदीला पुरसदृश्य स्थिती निर्माण झाल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काल रात्री बंद करण्याच्या सूचना लातूरचे जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत. जिल्ह्यातील औसा तालुक्यातील उजनी इथं तेरणा नदी तर भातखेडा इथं मांजरा नदी वाहत आहे यामुळे या ठिकाणी वाहतूक बंद करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील धनेगाव इथल्या मांजरा धरणात पाणीसाठा वाढत असल्याने पाण्याचा विसर्ग कालपासून सुरू आहे.

या विद्यार्थ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी पोलीस यांना काही पर्यायी व्यवस्था होऊ शकते का आमची परिक्षा 9 वाजता आहे, आता मांजरा नदीचं पाणी कमी होण्यास आणखीन 6 तास लागतील असं विद्यार्थ्यांना समजलं असल्याने विद्यार्थी आता परीक्षेच्या चिंतेत आहेत. या परीक्षार्थ्यात नांदेड जिल्ह्यातील तर उदगीर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी सोलापूर पंढरपूर येथील परीक्षा केंद्र निवडले आहेत. सदर विद्यार्थी अडकून पडल्याने आता परीक्षा कशी द्यावी हा प्रश्न निर्माण झाला आहे. फार्मसी अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच काय होणार याच विवंचनेत विद्यार्थी आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: आंबे तोडण्यासाठी झाडावर चढला अन् बेशु्द्ध होऊन अडकला, पुण्यातील तरुणासोबत विपरितच घडलं!

Nashik Lok Sabha: महायुतीचं अखेर ठरलं! नाशिकमधून 'या' नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब? आज होणार घोषणा!

Petrol Diesel Rate 1st May 2024: महाराष्ट्रात आज पेट्रोल-डिझेलचा भाव किती? जाणून घ्या आजच्या किंमती

Cylinder Price: LPG सिलिंडर झाला स्वस्त, निवडणुकीच्या धामधुमीत सर्वसामान्यांना मोठा दिलासा; वाचा नवे दर...

Manipur Violence: पोलिसांनीच पीडित महिलांना जमावाच्या हवाली केलं; मणिपूर घटनेप्रकरणी सीबीआयचा धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT