कैलास चौधरी, उस्मानाबाद
उस्मानाबाद: जिल्ह्याचे पालकमंत्री कुठे आहेत असा सवाल आता उस्मानाबादकर विचारू लागले आहेत. पालकमंत्री शंकरराव गडाख हे फक्त ध्वजारोहणासाठी उस्मानाबाद येत असल्याची ओरड भाजपाकडून ही केली जात आहे. पालकमंत्र्यांच्या धावत्या दौऱ्यामुळे जिल्हावासी नाराज होत आहेत. (Where is the Guardian Minister of Osmanabad? ...Watch Video)
हे देखील पहा -
26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे, आणि 17 सप्टेंबर या दरम्यानच पालकमंत्री ध्वजारोहणासाठी येतात आणि यावेळी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन जिल्ह्याची पाहणी केल्याचा आव आणतात, हे पालकमंत्री उपरे पालकमंत्री असून उस्मानाबादने शिवसेनेला इतके भरभरून दिले असतानाही स्थानिक पालकमंत्री दिला नाही. त्यामुळे जिल्ह्याची फरफट होत आहे. आजही पालकमंत्री यांचा धावता दौरा असून घटनास्थळी भेट देत सरळ मार्गे त्यांच्या गावी परतणार असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.
राज्यात अनेक ठिकाणी पावसाचं पुनरागमन झालं असून अनेक जिल्ह्यांत पावसाचा कहर पहायला मिळतोय. अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश्य पावसामुळे पिकांच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यात अनेक जिल्ह्यांचे पालकमंत्री हे जिल्ह्यातच आले नसल्याने जनतेकडून संताप व्यक्त करण्यात येतोय.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.