पाण्यात अडकलेल्या एसटी बसला बाहेर काढण्याचे काम सुरु, चालक अजूनही बेपत्ता

पाण्यात अडकलेल्या एसटी बसला बाहेर काढण्यासाठी अपत्ती व्यवस्थापनची टीम सकाळीच कामाला लागली आहे, यात एसटी वाहक आणि दोन प्रवाशांचे मृतदेह सापडले आहेत.
पाण्यात अडकलेल्या एसटी बसला बाहेर काढण्याचे काम सुरु, चालक अजूनही बेपत्ता
पाण्यात अडकलेल्या एसटी बसला बाहेर काढण्याचे काम सुरु, चालक अजूनही बेपत्तासंजय राठोड
Published On

संजय राठोड, यवतमाळ

यवतमाळ: मंगळवारी सकाळपासून युद्धपातळीवर उमरखेड ते पुसद रस्त्यावर असलेल्या दहागाव नाल्यावर आपत्ती व्यवस्थापन आणि नागरिकांनी बचाव कार्य सुरू केले. मात्र संततधार पावसामुळे बचाव कार्यात अडथळे निर्माण झाल्याने रात्री उशीरा पर्यंत बेपत्ता असलेला एसटी चालकाला शोधण्यात यश आले नाही. (Work begins to pull ST bus out of water, driver still missing)

हे देखील पहा -

पाण्याच्या प्रवाहामुळे पाण्यात अडकलेल्या एसटी बसला सुद्धा बाहेर काढता आली नाही. त्यामुळे सकाळपासून पुन्हा एसटी बस आणि बेपत्ता असलेल्या चालकाचा शोध घेतल्या जात आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड ते पुसद मार्गावरील दहागाव जवळील नाल्याला मंगळवारी पूर आला दरम्यान नांदेड वरून नागपुरकडे जाणाऱ्या एसटी बसच्या चालकाला पुराच्या पाणाच्या अंदाज आला नाही, त्यामुळे एसटी बस पाण्यात वाहुन गेली. यात यात चार प्रवाशी आणि दोन एसटी कर्मचारी पुराच्या पाण्यात बेपत्ता झाले.

पाण्यात अडकलेल्या एसटी बसला बाहेर काढण्याचे काम सुरु, चालक अजूनही बेपत्ता
पुरात अडकलेल्या तिघांना हेलिकॉप्टरच्या मदतीने वाचवलं

काही वेळात एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले. त्यानंतर तब्बल आठ तासानंतर दोन मृतदेह बाहेर काढण्यात आली. आतापर्यंत एकुण तिघांचे मृतदेह सापडले असून अजूनही एसटी चालक बेपत्ता आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com