aaditya thackeray saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: सातारा, काेल्हापूरात पाॅलिटिक्सवर बाेलणं टाळणा-या आदित्य ठाकरेंनी काेकणात भाजप नेत्याला फटकारलं

साम न्यूज नेटवर्क

-विनायक वंजारे

सिंधुदुर्ग : काही लोक टीका करायला दौरे करतात असं म्हणत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विराेधी पक्ष नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्यावर टीका केली आहे. कोकणच्या (kokan) विकासासाठी प्लॅन तयार असून यापुढे कोकणच्या पर्यटन (kokan tourism) वाढीसाठी लक्ष दिले जाईल असे आश्वासन मंत्री ठाकरे (aaditya thackeray) यांनी येथे दिले. (aaditya thackeray latest marathi news)

समुद्र तळाचे अंतरंग न्याहळण्यासाठी अत्याधुनिक 'आरमार ' बोटीचं मंत्री ठाकरे यांच्या हस्ते आज उद्घाटन झाले. मालवण तारकर्ली येथील समुद्रात बोटीचं उद्घाटन करून तारकर्ली खाडीमार्गे मंत्री ठाकरेंनी समुद्रात फेरफटका मारला. त्यानंतर मंत्री ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

ते म्हणाले कोकणच्या विकासासाठी प्लॅन तयार असून यापुढे कोकणच्या पर्यटन वाढीसाठी लक्ष दिले जाईल. नाणार प्रकल्पाबाबत स्थानिकांना काय हवे हे पाहत लोकशाही आणि सकारात्मक पद्धतीने विचार केला जाईल. मुख्य म्हणजे तेल कारखाना कोकण किंवा महाराष्ट्रमध्येच होणार का? यावर उत्तर देणे आदित्य यांनी टाळले आहे.

नितेश राणेंबाबतच्या प्रश्नावर बोलण टाळत मंत्री ठाकरे म्हणाले छान वातावरण आहे. एन्जॉय करा. चांगली कामे देशासाठी ,समाजासाठी, राज्यासाठी करत राहा असा चिमटा मात्र त्यांनी नितेश राणेंचं नाव न घेता काढला.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Bigg Boss Marathi : कालपर्यंत कडू होतं? निक्कीचा अरबाजला सवाल, बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय?

निवडणुकीआधीच महायुतीला मोठा धक्का, मित्रपक्षाने साथ सोडली, माजी मंत्र्याची भरसभेत घोषणा!

Hair Care Tips : ऐन तारुण्यात केस पांढरे झालेत? वाचा या मागचं खरं कारण

Mahad News : बिल थकविल्याने विज पुरवठा केला खंडीत; महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

SCROLL FOR NEXT