Lalu Yadav: 'भाजपशी तडजोड केली असती तर लालू त्यांच्यासाठी राजा हरिश्चंद्र ठरले असते'

काही असो लालू कधीही घाबरणार नाहीत आणि गुडघे टेकणार नाहीत. खरं तर ते नेहमी त्यांच्या विचारसरणीला चिकटून राहतील असे तेजस्वी यादव यांनी नमूद केले.
tejashwi yadav and lalu prasad yadav
tejashwi yadav and lalu prasad yadavSaam Tv

नवी दिल्ली : आमचे नेते आणि माझे वडील लालूंनी (Lalu Prasad Yadav) भाजपाशी जुळवून घेतले असते तर भाजपने त्यांना 'राजा हरिश्चंद्र' (Raja Harishchandra) पदवी बहाल केली असती. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (cm nitish kumar) यांनी आजही लालूंची भीती वाटत आहे. त्यामुळे ते भाजपशी संगनमत करीत लालूंबद्दल जनतेत नकारात्मक वातावरण निर्माण करण्याचे घाणेरडे राजकारण करीत आहेत असा आराेप राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि लालू प्रसाद यांचे चिरंजीव तेजस्वी यादव यांनी केला आहे. (lalu prasad yadav latest marathi news)

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद (lalu prasad) यांना आज सीबीआयच्या (CBI) विशेष न्यायालयाने दुसऱ्या चारा घोटाळ्यात दोषी ठरवत ३.५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. यावर बिहारचे (bihar) माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी म्हणाले आम्ही उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयातही या शिक्षेविरुद्ध अपील करणार आहाेत.

तेजस्वी पुढं म्हणाले जर लालूजींनी भाजपशी (bjp) तडजोड केली असती, तर ते त्यांच्यासाठी राजा हरिश्चंद्र यांच्यासारखे सर्वात सत्यवादी ठरले असते. भाजप-आरएसएस युती लालूंना तुरुंगात असतानाही घाबरत आहे आणि ते शक्य ते सर्व करत आहेत. लालूंचा आवाज शांत करा एवढंच त्यांचे ध्येय आहे.

tejashwi yadav and lalu prasad yadav
'येथे' व्हॉट्सअ‍ॅपवर Heart Emoji पाठवल्यास होऊ शकतो तुरुंगवास आणि 20 लाखांचा दंड! जाणून घ्या प्रकरण

आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. आरएसएसचा आरजेडी फोडण्याचा हा कट आहे, ज्यामध्ये लालूजींना बळीचा बकरा बनवण्यात आले होते. पण त्यांनी हे लक्षात ठेवावे की, सीबीआय कोर्टाच्या निकालाविरुद्ध अपील करण्यासाठी आमच्याकडे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय अजूनही आहे असेही तेजस्वी यांनी नमूद केले.

tejashwi yadav and lalu prasad yadav
AFC Asian Cup 2023: भारतास मिळाला आशियाई फुटबाॅल करंडक अंतिम पात्रता फेरीच्या आयाेजनाचा मान

काही असो लालू कधीही घाबरणार नाहीत आणि गुडघे टेकणार नाहीत. खरं तर ते नेहमी त्यांच्या विचारसरणीला चिकटून राहतील असे तेजस्वी यांनी नमूद केले. तेजस्वी यांनी एनडीए सरकारवर लालूंविरोधात कट रचल्याचा आरोप केला. सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांना एकत्र आणणारी ते एकमेव शक्ती होती असेही ते म्हणाले. नुकत्याच झालेल्या गुजरा निवडणुकांनी हे सिद्ध केले आहे की या देशात फक्त लालूच एनडीए आणि आरएसएसला आव्हान देऊ शकतात असा दावा तेजस्वी यांनी केला.

Edited By : Siddharth Latkar

tejashwi yadav and lalu prasad yadav
Satara: रविवार ठरला अपघात वार; पसरणी घाटात बर्निंग बसचा थरार, S Corner ला सहा वाहन आदळली

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com