'येथे' व्हॉट्सअ‍ॅपवर Heart Emoji पाठवल्यास होऊ शकतो तुरुंगवास आणि 20 लाखांचा दंड! जाणून घ्या प्रकरण

यूजर्स आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपवर इमोजी (Emoji) वापरतात. काहीवेळा इमोजी अशा काही गोष्टी सांगतात, ज्या आपल्याला मजकुरात नीट सांगता येत नाहीत. पण इमोजीमुळे तुरुंगात जावं लागलं तर? हो असा कायदा आहे, ज्यामुळे इमोजी तुम्हाला तुरुंगात टाकू शकतो.
WhatsApp
WhatsAppSaam Tv
Published On

यूजर्स आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपवर (WhatsApp) इमोजी (Emoji) वापरतात. काहीवेळा इमोजी अशा काही गोष्टी सांगतात, ज्या आपल्याला मजकुरात नीट सांगता येत नाहीत. पण इमोजीमुळे तुरुंगात जावं लागलं तर? हो असा कायदा आहे, ज्यामुळे इमोजी तुम्हाला तुरुंगात टाकू शकतो.

व्हॉट्सअ‍ॅपवर 'रेड हार्ट' इमोजी पाठवणे सौदी अरेबियामध्ये (Saudi Arabia) गुन्हा ठरू शकतो. अहवालानुसार, सौदी सायबर क्राईम तज्ञांनी लोकांना व्हॉट्सअ‍ॅपवर रेड हार्ट इमोजी (Red Heart Emoji On Whatsapp) पाठवण्याबाबत चेतावणी दिली आहे. एका स्थानिक वृत्तपत्राला दिलेल्या निवेदनात, सौदी अरेबियाच्या अँटी फ्रॉड असोसिएशनच्या (Anti-Fraud Association) एका सदस्याने सांगितले आहे की, व्हॉट्सअ‍ॅपवर रेड हार्ट इमोजी पाठवणे हा छळ करणारा (Harassment) गुन्हा असू शकतो.

WhatsApp
नॅशनल क्रश रश्मिका मंदाना लवकरच लग्नबंधनात अडकणार? होणार 'या' घरची सून?

संदेश प्राप्तकर्त्याने तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली तर तुम्ही तुरुंगातही जाऊ शकता. त्यांनी सांगितलं, 'ऑनलाइन चॅट्सदरम्यान पाठवलेली काही चित्रे आणि ईमोजी हे छळवणूक करणे असू शकते, जर संदेश स्वीकारणारा त्यावर कायदेशीर कारवाई करेल.

रिपोर्टनुसार, जर रेड हार्ट इमोजी पाठवणारी व्यक्ती सौदीच्या कायद्यानुसार दोषी आढळली तर त्याला 2 ते 5 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो. यासोबतच गुन्हेगाराला 100,000 सौदी रियाल (सुमारे 19,90,000 रुपये) दंडही भरावा लागणार आहे.

हे देखील पहा-

जर एखाद्या वापरकर्त्याने हा गुन्हा पुन्हा केला तर त्याच्या अडचणी आणखी वाढतील. पुन्हा दोषी आढळल्यास, वापरकर्त्यास 5 वर्षांचा तुरुंगवास आणि 300,000 सौदी रियाल दंड भरावा लागेल. म्हणजेच तुमच्याकडून पाठवलेल्या मेसेजवर जर एखाद्या यूजरला आक्षेप असेल तर तो अडचणीत येऊ शकतो.

व्हॉट्सअॅपवर अनेक इमोजी उपलब्ध आहेत, परंतु रेड हार्ट इमोजी अ‍ॅनिमेटेड आहेत. काही अहवालांवर विश्वास ठेवला तर, मेटा लवकरच त्याच्या इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हाट्सएपमध्ये आणखी अनेक अ‍ॅनिमेटेड इमोजी आणणार आहे. सध्या, तुम्हाला WhatsApp वर 9 हार्ट इमोजी मिळतात, ज्यामध्ये एक अ‍ॅनिमेटेड आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com