Buldhana News Saam Tv
महाराष्ट्र

Buldhana News: देऊळगाव मही वासियांकडून वारकऱ्यांना आमरसाची खास मेजवानी...

Muktai Palkhi News: दरवेळी पंढरपूरला जाताना देऊळगाव मही येते संत मुक्ताईची पालखी मुक्कामला असते आणि ग्रामस्थ प्रत्येक वारकऱ्यांना आपल्या घरी जेवायला घेऊन जातात.

संजय जाधव

Buldhana News Today: आदिशक्ती मुक्ताईच्या पालखीतील वारकरी म्हणजे आमच्यासाठी विठ्ठल अन् मुकताईच आशा विठ्ठलाला आणि मुक्ताईला देऊळगाव महीचे ग्रामस्थांनी खास पाहुणचार केलाय तोही आमरसचा. रांगोळीने सजवलेले ताट पाहून वारकरी सुद्धा आनंदित झाले आणि ही परंपरा आजही अखंड सुरू असून आजचा दिवस म्हणजे देऊळगाव मही ग्रामस्थांना दिवाळी सणा पेक्षाही आनंदचा क्षण आहे. (Latest Marathi News)

दरवेळी पंढरपूरला (Pandharpur) जाताना देऊळगाव मही येते संत मुक्ताईची पालखी मुक्कामला असते आणि ग्रामस्थ प्रत्येक वारकऱ्यांना आपल्या घरी जेवायला घेऊन जातात. जणू वारकरी जिंकण्यासाठी ग्रामस्थांची स्पर्धाच असते. एरव्ही इतर ठिकाणी पालखीचे जेवण हे एकाच ठिकाणी होते.

मात्र, देऊळगाव मही येथील ग्रामस्थ हे वारकऱ्यांना आपल्या घरी जेवायला घेऊन जातात. प्रतेक जण आपल्या परीने वारकऱ्यांची सेवा करतात. कुणी पुरण पोळी, तर कुणी आमरस तर कुणी मिरची भाजीचा पाऊणचार करत असतो. (Buldhana News)

मात्र यावर्षी आंब्याचे सिझन सुरू असल्याने वारकऱ्यांना आमरसचा पाऊणचार आहे. देऊळगाव मही येथील भगवान इंगळे सुद्धा त्यांच्या घरी वारकऱ्यांना घरी जेवायला घेऊन आले होते. भगवान इंगळे यांच्या आजोबा, पणजोबा पासून वारकऱ्यांना जेवण्यासाठी त्यांच्या घरी घेऊन जातात, आणि खास पाऊणचार करून वारकऱ्यांची ते सेवा करतात. जेवण झाल्यावर वारकऱ्यांची झोपण्याची सुद्धा व्यवस्था करतात.

सकाळी पालखी समोरच्या मुक्कामाला निघत असते. तर देऊळगाव मही येथील समाधान शिंगणे यांनी सुद्धा वारकऱ्यांना आमरसचा पाऊणचार केला असून त्यांचा हार, शाल देऊन सत्कार ही केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तुळजाभवानी टेंपल ट्रस्टकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत

Weather Update: थंडी गायब, पावसाचा धुमाकूळ सुरूच; १० ठिकाणी वादळी वाऱ्यासह तुफान पावसाचा अंदाज; ताशी ६० किमीच्या वेगाने वारे वाहणार

Friday Horoscope : शुक्रवारी ५ राशींचं नशीब चमकणार! कन्या राशीला घर-गाडीचा योग, 'या' राशींचं टेन्शन वाढणार?

शिक्षकांचा ऑनलाईन कामांवर टाकणार बहिष्कार; प्रशासकीय कामांविरोधात शिक्षक संघटना आक्रमक

पनवेलमध्ये भाजपच्या दिग्गज नेत्यांची बैठक; प्रदेशाध्यक्षांनी कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र, ठरवली पुढील रणनीती

SCROLL FOR NEXT