CBI Raid on IAS Dr. Anil Ramod House: CBI कडून अनिल रामोड यांच्या घरी रात्री उशिरापर्यंत तपास, 6 कोटींच्या रोकडसह कागदपत्रे जप्त

Pune News: या तपासात रामोड यांच्या घरी 6 कोटी रुपयांची रोख रक्कम सापडली आहे. तसंच 14 बेहिशेबी मालमत्तांचे पेपर्स सापडले आहेत.
Cbi Raids ON IAS Officer
Cbi Raids ON IAS OfficerSaam Tv
Published On

Pune News Today: सीबीआयने पुणे विभागाचे अतिरिक्त महसूल विभागीय आयुक्त अनिल रामोड यांना तब्बल 8 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. रात्री उशिरा 3 पर्यंतरामोड यांच्या घरी तपास सुरु होता. तपासात रामोड यांच्या घरी 6 कोटी रुपयांची रोख रक्कम सापडली आहे. तसंच 14 बेहिशेबी मालमत्तांचे पेपर्स सापडले आहेत. त्याची किंमत अद्याप निश्चित केलेली नाही. त्यानंतर आज (10 जून) रामोड यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.  (Latest Marathi News)

Cbi Raids ON IAS Officer
Kalyan Crime News: कल्याण हादरलं! घरात एकटी असल्याची संधी साधून तरुणीवर अत्याचार

मुळचे नांदेडचे (Nanded) रामोड हे गेल्या दोन वर्षांपासून पुण्यात (Pune) अरिरिक्त विभागीय आयुक्त या पदावर काम पहात आहेत. महामार्गावरील भूसंपादनाचा मोबदला शेतकऱ्यांना देण्यासाठी त्यांनी 8 लाख रुपयांची मागणी केली होती आणि तीच रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

रामोड यांच्याकडे वेगवेगळ्या शासकीय कामांसाठी भूसंपादन करण्याची आणि त्या बदल्यात शेतकऱ्यांना त्याचा मोबदला देण्याची जबाबदारी होती. पण रामोड हे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला देण्यासाठी कमिशन म्हणून लाखो रुपयांची मागणी करत होते. (Pune News)

Cbi Raids ON IAS Officer
Amaravati News: नितेश राणेंच्या सभेचा मंडप उडाला, कोणी बांबू पकडला तर कोणी तंबू; व्हिडीओ व्हायरल

सोलापूर येथील माळशिरस तालुक्यातील एका शेतकऱ्याला जमिनीचा मोबदला देण्यासाठी रामोड यांनी 8 लाख रुपयांची लाच मागितली होती. ती स्विकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा सगळा व्यवहार हायवेच्या लगत असलेल्या एका जमिनीबाबत होता. दरम्यान, या प्रकरणी आता रामोड यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com