Amaravati News: नितेश राणेंच्या सभेचा मंडप उडाला, कोणी बांबू पकडला तर कोणी तंबू; व्हिडीओ व्हायरल

नितेश राणेंच्या सभेचा मंडप उडाला, कोणी बांबू पकडला तर कोणी तंबू; व्हिडीओ व्हायरल
Amravati Bjp Leader Nitesh Rane Meeting Pandal Collapse
Amravati Bjp Leader Nitesh Rane Meeting Pandal CollapseSaam Tv
Published On

>> अमर घटारे

Nitesh Rane Meeting Pandal Collapse: भाजप आमदार नितेश राणे यांच्या सभेचा मंडप उडाल्याची घटना अमरावती येथील नांदगाव एमआयडीसीमध्ये घडली आहे. नरेंद्र मोदी यांच्या सरकारला नऊ वर्ष झाल्याने या निमित्ताने नांदगाव पेठ एमआयडीसी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं.

या दरम्यान या कार्यक्रमाला भाजपा खासदार अनिल बोंडे, आमदार नितेश राणे, आमदार प्रवीण पोटे सह भाजप नेते उपस्थित होते. मात्र अचानक सुसाट वारा आला त्यामुळे हवेने पूर्णपणे मंडप खाली कोसळला या मंडपखालून नितेश राणे,अनिल बोडे यांच्यासह भाजपा नेत्यांना यावेळी सुखरूप बाहेर काढण्यात आले. मात्र या ठिकाणी मोठी घटना टळली या दरम्यान मंडप खाली कोसळला असल्याने मोठा गोंधळ उडाला होता.  (Maharashtra Politics)

Amravati Bjp Leader Nitesh Rane Meeting Pandal Collapse
Political Breaking News: मोठी बातमी! वर्षा गायकवाड काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष; भाई जगताप यांना हटवले

शरद पवार राज्यात काहीही त्रास होणार नाही : नितेश राणे

आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जिवेमारण्याची धमकी मिळली आहे. या कार्यक्रमाआधी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले आहेत की, ''शरद पवार यांच्याशी आमचे विचार पटत नसले तरी त्यांना आमच्या राज्यात काहीही त्रास होणार नाही. एवढी काळजी आमचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील.'' (Latest Marathi News)

ते म्हणाले, ''शेवटी हे उद्धव ठाकरेचे सरकार नाही. महाविकास आघाडीचे सरकार नाही. जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार होतं, तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची संरक्षण कमी करण्यात आला. त्यांना धोका असताना संरक्षण काढण्यात आला होतं. तशा गोष्टी आम्ही करणार नाही.''

Amravati Bjp Leader Nitesh Rane Meeting Pandal Collapse
Pune News: मोठी बातमी! पुण्यात IAS अधिकाऱ्यावर CBI ची छापेमारी, लाच स्वीकारताना पकडलं

ते पुढे म्हणाले, ''पवार यांची सगळी काळजी घेण्याची जबाबदारी आमच्या सरकारची आहे.'' संजय राऊत यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले, ''तुम्ही ज्या दुसऱ्या व्यक्तीचा (संजय राऊत) नाव घेत आहे. आता मच्छर मारण्यासाठी कोणाला धमकी देण्याची गरज नाही.''

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com