Kalyan Crime News: कल्याण हादरलं! घरात एकटी असल्याची संधी साधून तरुणीवर अत्याचार

कल्याणमध्ये एका तरुणीवर घरात घुसून तरुणाने वारंवार अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
manpada police station
manpada police station Saam TV
Published On

अभिजीत देशमुख

Kalyan Crime News: कल्याणमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याणमध्ये एका तरुणीवर घरात घुसून तरुणाने वारंवार अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. कल्याण पूर्व भागातील पीसवली परिसरात ही घटना घडली आहे. मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत सागर गाडे याला अटक केली आहे. (Latest Marathi News)

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, सदर पीडित तरुणीही कल्याण जवळील पिसवली आपल्या बहिणीच्या कुटुंबासोबत राहते. तीन वर्षांपूर्वी या पीडीत तरुणीने दहावीच्या परीक्षेचे टेन्शन घेतल्याने तिचे मानसिक संतुलन बिघडले होते.औषध उपचारानंतर तिची तब्येत सुधारत चालली होती.

काही महिन्यांपूर्वी पीडितेची बहीण आजारी असल्याने ती गावाला गेली होती. बहिणीचे पती कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर पीडिता घरी एकटीच असायची. ही संधी साधत शेजारी राहणाऱ्या सागर याने तिची छेड काढण्यास सुरुवात केली.

manpada police station
Dombivli Crime News: संतापजनक! दुचाकीची कागदपत्रे मागितल्याने पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; तरुण अटकेत

महिनाभरापूर्वी सागरने तिच्या घरात घुसून तिच्यावर बळजबरी करण्याचा देखील प्रयत्न केला. आरडा ओरड केल्याने तो तेथून निघून गेला. मात्र त्याने पीडितेला धमकवल्याने पीडिता घाबरली होती. त्यानंतर काही दिवसांनी सागर ने पुन्हा तिच्या घरात घुसून तिच्यावर अत्याचार केला.

त्यानंतर त्याने त्याच दिवशी वारंवार तिच्यावर अत्याचार केला. याबाबत कोणाला सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने पीडिता घाबरली होती. त्यामुळे तिने याची वाच्यता कुठेच केली नाही. सागरने पीडिता घराबाहेर पडली असता भर रस्त्यात तिची छेड काढली. त्यामुळे घाबरलेल्या पीडितेने घडलेला प्रकारआपल्या कुटुंबाला सांगितला.

manpada police station
Jalna Crime News: बायको गावाला गेली, नराधम जावयाने सासूवर केला अत्याचार; जालन्यातील संतापजनक घटना

पीडितेच्या बहिणीच्या पतीने सागरला याचा जाब विचारला असता त्याने व त्याच्या कुटुंबाने त्यांचे माफी मागितली. मात्र त्यानंतर काही दिवसानी पुन्हा सागरने कुटुंबाला धमकावले.. अखेर या घडल्या प्रकरणी पीडीतेने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पीडितेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी नराधम सागर विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com