Ramdas Athawale News: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना शुक्रवारी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या घटनेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेवर आता रामदास आठवले यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)
शरद पवार (Sharad Pawar)यांच्या सारख्या नेत्याला धमकीचे फोन येणं ही बाब अत्यंत गंभीर असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी दिली आहे. दिघा येथे आरपीआय तर्फे आयोजित महामानवांची संयुक्त जयंती उत्सव आणि पँथर्सचा सत्कार समारोहासाठी रामदास आठवले आले असता त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
महाराष्ट्र मध्ये काय चाललेय हे काही योग्य नाही. कोणत्याही राजकीय नेत्याला धमकीचे फोन येणे योग्य नाही. याप्रकरणी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) चौकशी करत असून जे दोषी आढळतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया आठवले यांनी दिली आहे.
दरम्यान, शरद पवार यांना ट्विटरवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. 'तुमचा दाभोलकर करु', अशी धमकी ट्वीटरवरुन शरद पवार यांना देण्यात आली. शरद पवार यांना मिळालेल्या धमकीनंतर राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. या प्रकरणी सुप्रिया सुळे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.