Aurangabad Bharat Fulare  Saam TV
महाराष्ट्र

ऐकावं ते नवलंच! पठ्ठ्याने स्वत:ला घोषित केलं सामाजिक न्यायमंत्री; नागरिकांच्या सोडवतोय समस्या

भारत आसाराम फुलारे असे या पठ्ठ्याचे नाव आहे

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद : औरंगाबाद (Aurangabad) शहरातील एका पठ्ठ्याने स्वतःला राज्याचा सामाजिक न्यायमंत्री (Minister) म्हणून घोषित केले आहे. यासंबंधीचे बॅनर तयार करून हा पठ्ठ्या स्वतःच्या गाडीवर लावून फिरत आहे. भारत आसाराम फुलारे असे या पठ्ठ्याचे नाव आहे. त्याने आपल्या गाडीवर लावलेले बॅनर सध्या शहरात चर्चेचा विषय ठरत आहे. (Aurangabad Latest News)

नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा औरंगाबाद दौरा पार पडला. या दौऱ्यातच भारत फुलारे या पठ्ठ्याने मी स्वतःला सामाजिक न्याय मंत्री म्हणून घोषित करतो अशी घोषणा केली. विशेष बाब म्हणजे काही नागरिक या पठ्ठ्याकडे आपल्या समस्या घेऊन देखील आल्याचे त्याने सांगितले.

'संविधानानुसार राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होणे गरजेचे होते. मात्र काही अपरिहार्य कारणामुळे शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. परिणामी महाराष्ट्रातील विविध समस्या वाढत आहेत. असं या पठ्ठ्याने म्हटलं आहे. (Aurangabad Todays News)

'मंत्रिमंडळ विस्तार न झाल्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेवर पोरकेपणाची वेळ आली आणि यामुळे आता जनतेने स्वयंघोषित मंत्रीपदे घेण्याची गरज आहे. यामुळे मी जनतेच्या हितासाठी स्वतः सामाजिक न्याय मंत्री म्हणून घोषित करून जनतेच्या न्याय व हक्कासाठी लढण्याची शपथ घेतली आहे' असं या पठ्ठ्याने सांगितले आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: भरधाव कंटेनर गणरायाच्या आगमन मिरवणुकीत घुसला, १४ जणांना चिरडलं; २ शेतकऱ्यांनी जागीच सोडले प्राण

Maharashtra News Live Update: पुण्यात ३५ हजार महिलांकडून सामूहिक अथर्वशीर्ष पठण

Diabetes Diet : काळा की पिवळा, डायबिटीज रुग्णांनी कोणता गुळ खावा? शुगर कंट्रोल ठेवण्यासाठी जाणून घ्या

Tuesday Horoscope : गणेशोत्सवात या 4 राशींचे नशीब पालटणार! पैसा, प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठा फायदा; आजचे राशीभविष्य

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT