फक्त चार षटकार! आजच्या सामन्यात रोहित शर्मा मोडणार पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचा मोठा विक्रम?

वेस्ट इंडिज विरुद्ध आज होणाऱ्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माला मोठा विक्रम करण्याची संधी आहे.
Rohit Sharma
Rohit Sharma saam tv

नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये आज दुसरा टी-२० सामना सेंट किट्समध्ये खेळवला जाणार आहे. पाच टी-२० सामन्यांची मालिका (T-20 Cricket) सुरु असून पहिल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय मिळवला. दरम्यान, वेस्ट इंडिज विरुद्ध आज होणाऱ्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) मोठा विक्रम करण्याची संधी आहे. रोहितला पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीचा (shahid afridi) विक्रम मोडण्यासाठी ५७ धावांची खेळी करत चार षटकारांचा पाऊस मैदानात पाडावा लागणार आहे.

Rohit Sharma
Commonwealth Games 2022 : भारताचा पाकिस्तानवर एकतर्फी विजय, स्मृती मानधनाची चौफेर फटकेबाजी

२००७ मध्ये पदार्पण करणाऱ्या रोहित शर्माने ४०७ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आतापर्यंत ४७३ षटकार ठोकले आहेत. मात्र, पाकिस्तानचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी रोहितच्या पुढे आहे. आफ्रिदीने ५२४ सामन्यांमध्ये ४७६ षटकार मारले आहेत. तर युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलने ४८३ सामन्यांमध्ये सर्वात जास्त ५५३ षटकार ठोकले आहेत. त्यामुळे सर्वात जास्त षटकार ठोकण्याचा विक्रम गेलच्या नावावर आहे. अशातच आजच्या सामन्यात रोहित शर्माने चार षटकार मारले तर शाहिद आफ्रिदीला मागे टाकत रोहित दुसऱ्या स्थानावर येईल.

Rohit Sharma
Lawn Bowls CWG22 : लॉन बॉल खेळात टीम इंडियानं आज रचला इतिहास; उद्या दक्षिण आफ्रिकेशी लढत

५७ धावा केल्यावर अजून एक विक्रम

भारत विरुद्ध वेस्ट इंडिजच्या आजच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात रोहित शर्माने ५७ धावा केल्यावर आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३५०० धावा पूर्ण करणारा रोहित पहिला खेळाडू बनेल. रोहित शर्मानंतर न्यूझीलंडच्या मार्टिन गप्तिल (३३९९), भारताचा विराट कोहली (३३०८), आर्यलॅंडचा पॉल स्टर्लिंग (२८९४) आणि ऑस्ट्रेलियाचा अॅरेन फिंच (२८५५) हे खेळाडू क्रमवारीत आहेत.

भारताची संभाव्य प्लेईंग ११

रोहित शर्मा (कर्णधार ), सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा,रिषभ पंत (विकेट किपर ), हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, दिनेश कार्तिक, रविचंद्रन आश्विन, रवी बिश्नोई, भूवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com