बर्मिंगहॅम : बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये (common wealth games 2022) टीम इंडियाचं (india) आणखी एक पदक (medal) निश्चित झालं आहे. आज (साेमवार) टीम इंडियाच्या महिला खेळाडूंनी लॉन बॉल (Lawn Bowl) क्रीडा (sports) प्रकारात अंतिम फेरी गाठली. या संघाने उपांत्य फेरीत न्यूझीलंड संघाचा पराभव केला. (Common Wealth Games 2022 Latest Marathi News)
लॉन बॉल या क्रीडा प्रकारात भारतीय संघात समावेश असलेल्या चौबे (Choubey), पिंकी (Pinki), नयामोनी सैकिया (Nayamoni Saikia) आणि रूपा राणी टिर्की (Rupa Rani Tirkey) यांनी आज न्यूझीलंड संघाचा (16-13) असा पराभव केला. (Lawn Bowls Marathi News)
प्रारंभी भारतीय संघ पिछाडीवर हाेता. त्यानंतर संघाने उत्तम खेळ करीत अंतिम फेरी गाठली. उद्या (मंगळवार) भारतीय संघाची अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेशी लढत हाेईल. आजच्या विजयानंतर भारतीय संघातील खेळाडूंनी एकमेकांना मिठी मारत आनंदश्रुांना वाट माेकळी करुन दिली.
यंदाच्या काॅमनवेल्थ गेम्समध्ये आत्तापर्यंत देशानं सहा पदकांची (India At Common Wealth Games) कमाई केली आहे. उद्या लॉन बॉल सामन्यानंतर देशाच्या पदक तालिकेत आणखी एका पदकाची भर पडणार आहे. उद्याचा सामना भारताने जिंकल्यास सुवर्ण पदकात भर पडेल अथवा राैप्य पदकावर समाधान मानावं लागेल हे मात्र निश्चित.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.