सांगली : कॉमनवेल्थ गेम्समध्ये (common wealth games 2022) रौप्यपदक पटकावित देशाचा (india) आणि आपल्या सांगली (Sangli) जिल्ह्याचा नावलाैकिक अटकेपार नेणा-या संकेत सरगर (Sanket Sargar) याच्यावर राेख रकमेच्या बक्षीसांचा वर्षावर हाेऊ लागला आहे. यामुळे संकेत याल पुढच्या स्पर्धांच्या तयारीसाठी आर्थिक आधार मिळू लागला आहे. (Sanket Sargar Latest News)
बर्मिंगहॅम (birmingham) येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत शनिवारी संकेत महादेव सरगर (Sanket Mahadev Sargar) याने 55 किलो वजनी गटात वेटलिफ्टिंगमध्ये (weightlifting) रौप्यपदक (silver medal) पटकाविले. संकेतच्या यशानं राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने पदकाचं (india at commonwealth games 2022) खातं खाेललं. त्यानंतर आज दुपारपर्यंत देशातील वेटल्फिटरनी विविध गटात यश मिळवलं. आज दुपारी पर्यंत भारताने सहा पदकांची कमाई केली आहे. (india at commonwealth games 2022 marathi news)
संकेतनं मिळविलेल्या यशानंतर महाराष्ट्र सरकारनं त्यास तीस लाखांचे पारिताेषिक जाहीर केले आहे. याबाबतची घाेषणा रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली. संकेतच्या यशाची दखल राज्यातील तसेच सांगली जिल्ह्यातील विविध संस्था, लाेकप्रतिनिधी घेऊ लागले आहेत. त्यास राेख बक्षीस जाहीर करु लागले आहेत. (india at commonwealth games 2022 latest news)
महाराष्ट्र सरकारनंतर संकेत सरगरच्या कुटूंबास अभिजीत कदम मेमोरियल फाउंडेशनकडून एक लाखाचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. ज्या अकादमीत संकेतने सराव केला त्या दिग्विजय अकादमीस देखील पाच लाखांचे बक्षीस काँग्रेस नेते आणि माजी कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम (vishwajeet kadam) यांनी जाहीर केले.
संकेत सरगरच्या सांगलीतील अहिल्यादेवी होळकर चौकातील घरी काँग्रेस नेते आणि माजी कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी भेट दिली. यावेळी संकेत सरगरचे प्रशिक्षक मयूर सिंहासने देखील उपस्थित होते. यावेळी माजी मंत्री कदम यांनी संकेत सरगरच्या कुटुंबियांचे अभिनंदन केले. तसेच त्याची वेटलिफ्टर बहीण काजलच्या (Kajal Sargar) खेला इंडिया (Khelo India Youth Games) गेम्समधील तिच्या कामगिरीचे कौतुक केले.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.