Udayanraje Bhosale : काय ते एकदा होऊन जाऊ द्या ! उदयनराजेंनी शिवेंद्रसिंहराजेंचं 'ते' चॅलेंज स्विकारलं

आगामी सातारा पालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने दाेन्ही राजे सध्या एकमेकांच्या आघाडीच्या कामाचा पाणउतारा करीत आहे.
Udayanraje Bhosale , Shivendraraje Bhosale, Satara , Satara Palika, Satara Muncipal Council
Udayanraje Bhosale , Shivendraraje Bhosale, Satara , Satara Palika, Satara Muncipal Councilsaam tv

सातारा : सातारा विकास आघाडीने सातारकरांना दिलेलं वचन पाळलं आहे. आम्ही सर्व विकासकामं मार्गी लावली आहेत. आम्ही करीत असलेल्या कामाचं ऑडिट जाहीर केलं आहे. पारदर्शकता कारभाराची मांडणी करणारी सातारा (satara) विकास आघाडी राज्यात एकमेव ठरली आहे. दरम्यान आम्ही काेठून किती निधी आणला याची विचारणा हाेऊ लागली आहे. आम्ही त्याची मांडणी करण्यासाठी तयार आहाेत. तुम्ही आमचे आजपर्यंतचं आव्हान कधी स्विकारलं नाही असाे आम्ही तुम्ही दिलेलं आव्हान स्विकारताे असे खासदार उदयनराजे भाेसले (Udayanraje Bhosale) यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले (Shivendraraje Bhosale) यांनी दिलेल्या आव्हानास पत्रकातून प्रतिसाद दिला आहे. (Udayanraje Bhosale News)

एकदा हाेऊनच जाऊ द्या

आम्ही कामं करुन सुध्दा स्वतः बाळबोध असल्याचे समजुन साविआ आणि आमच्यावर भ्रष्टाचार, कमिशन, टक्केवारी इत्यादी बाबत आरोप होत आहेत. भ्रष्टाचारामध्ये आकंठ बुडालेल्या व्यक्तीने अशी ओरड करणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत असं खासदार उदयनराजे भाेसले यांनी म्हटलं आहे. पालिका निवडणुका आधीच त्यांचा पराभव दिसत असल्याचे प्रथम वृत्तपत्रातुन पत्रकबाजी आणि नंतर इलेक्ट्रॉनिक संचार माध्यमातुन आमची नाहक बदनामी करण्याचा प्रकार सुरु आहे, त्यांच्या बेलगाम आणि बिनबुडाच्या, बिनपुराव्याच्या आरोपांना उत्तर देणे आम्हाला प्रशस्त वाटत नव्हते परंतु एकदा दुध का दुध-पाणी का पाणी होऊनच जाऊ द्या असंही उदयनराजेंनी नमूद केले आहे. (Satara Latest Marathi News)

Udayanraje Bhosale , Shivendraraje Bhosale, Satara , Satara Palika, Satara Muncipal Council
Satara : शिवेंद्रसिंहराजेंचं चॅलेंज उदयनराजे स्विकारणार ?

वेळ आल्यावर जनतेस सांगणार

नागरीकांनी आम्हाला ज्या विश्वासाने भरभरुन प्रेम दिले आहे त्या विश्वासाला तडा जावू न देता, सातारा नगरपरिषदेचा कार्यकाल अतिशय संयमाने चालवण्यात आला. फक्त साविआच्याच नगरसेवकांची नाही तर सर्वच नगरसेवकांची कामे समयोचित प्रकारे मार्गी लावणेचे धोरण स्विकारले होते. सगळे नगरसेवक सातारकरांच्या उपयुक्तच कामे सुचवितात ही धारणा त्या धोरणामध्ये होती. त्यानुसार सर्वच नगरसेवकांची विविध कामे समयोचित पध्दतीने मार्गी लावण्यात आली. त्याचप्रमाणे राज्य सरकार आणि केंद्रसरकार कडून जास्तीत जास्त निधी आणण्यात आला आहे. राज्याचे आणि केंद्राचे स्वच्छ सर्वेक्षण अभियान, घरकुल योजना, प्रधानमंत्री आवास योजना, अमृत योजना, वित्त आयोग या सर्व केंद्राच्या योजना असून, त्यामधुन भरघोस निधी प्राप्त करुन घेण्यात आला आहे. सातारा विकास आघाडीच्या वचननाम्यातील कास धरण उंची वाढवणे, भुयारी गटर योजना, घनकचरा व्यवस्थापन, नवीन प्रशासकीय इमारत, ग्रेडसेपरेटर, आयुर्वेदिक गार्डन, शहरातील सर्व उद्यानांचे नुतनीकरण, जेष्ठ नागरीक भवन, घरकुल योजना, शहीद कर्नल संतोष महाडीक यांचे स्मारक, हद्दवाढ भागाकरीता सुरु करण्यात आलेली ०६ नवीन नागरी आरोग्य केंद्रे हे मुख्य मुद्दे मार्गी लागले आहेत. त्याचबरोबरीने दैनंदिन दिवा- बत्ती, रस्ते, पाणी, गटर्स इत्यादी सुविधांबाबत मोठ्या सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. पोवईनाका येथील श्री. छ. शिवरायांच्या स्मारकाच्या नुतनीकरण करण्यात येत आहे. या सर्व बाबींचा लेखाजोखा वेळ आल्यावर आम्ही विस्तृतपणे जनतेपुढे मांडणार आहोतच. (Udayanraje Bhosale Marathi News)

Udayanraje Bhosale , Shivendraraje Bhosale, Satara , Satara Palika, Satara Muncipal Council
Achinta Sheuli : भारतास तिसरे सुवर्णपदक मिळताच पंतप्रधान माेदी म्हणाले, आता आशा आहे की..., (व्हिडिओ पाहा)

सत्ताधिश असताना सुधारणा नाही

हे ज्यांचा वारसा सांगतात ते सर्व सत्ताधिश असतानाही त्यांनी कचरा उचलण्याच्या पध्दतीत सुधारणा केली नाही. वर्षोनुवर्षे, कच-याने पूर्ण भरलेल्या कुंड्या आडव्या पाडुन, त्यातील व आजुबाजुचा कचरा खो-याने गोळा करुन नगरपरिषदेच्या गाडीमध्ये, डंपरमध्ये कर्मचारी टाकत होते आणि तो वाहुन नेला जात असे. आम्ही सर्वप्रथम सिमेंटच्या कोंडाळ्या ऐवजी लोखंडी कुंड्या आणि त्या कुंड्यांच व्हॅक्युम यंत्रणेने गाडीमध्ये उचलुन घेवून थेट कचरा डेपोवर रिकाम्या करण्याची पध्दत राबविली. कालांतराने कुंडी मुक्त शहर ही संकल्पना राबविणेकरीता घरोघरी घंटागाडया सुरु केल्या. घंटागाड्या सुरु करणारी पश्चिम महाराष्ट्रातील सातारा नगरपरिषद ही पहिली नगरपालिका ठरली. हॉस्पिटल ओनर्स असोशिएशनच्या माध्यमातुन सर्वांत घातक ठरणारा बायोमेडीकल वेस्ट गोळा करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा राबविली. त्यांच्या सहकार्याने बायोमेडीकल वेस्ट प्लॅन्टसाठी जागा देवून तो उभारला. कचरा शहरात साठुच नये म्हणून सर्व उपाययोजना केल्या ज्या योजना यापूर्वी कधीही सर्वसत्ताधिश सत्ताधारी असताना केल्या गेल्या नाहीत. कच-याचे विलगीकरण करुन, त्यावर प्रक्रीया करण्याचा घनकचरा प्रकल्प सुरु केला. (Satara Politics News)

Udayanraje Bhosale , Shivendraraje Bhosale, Satara , Satara Palika, Satara Muncipal Council
"कोण चोर अन् कोण लुटारू हे सातारकरांनी चांगलंच ओळखलंय"; शिवेंद्रसिंहराजेंचा उदयनराजेंना खोचक टोला

पुराव्यानिशी बोला

सातारा विकास आघाडी हे एक मोठे कुटुंब आहे. सातारकर नागरीक, सातारा विकास आघाडीच्या कुटुंबातील सदस्य आहेत. या सदस्यनागरीकांना दैनंदिन गरजा सक्षमपणे पुरवणे बाबतची काळजी आम्ही नेहमीच घेतली आहे. असे असताना कचऱ्याबाबत, घंटागाड्यांबाबत भ्रष्टाचाराचे आरोप सुरु आहेत. ज्यावेळी हे आरोप करतात त्यावेळी पुराव्यानिशी बोलले पाहीजे. अन्यथा साविआची बदनामी करणे इतकाच प्रकार त्यांच्या कृतीतुन दिसत आहे. हा त्यांचा संकुचित स्वभाव आणि कर्मदरिद्रीपणाच म्हणावा लागेल. (Shivendraraje Bhosale News)

Udayanraje Bhosale , Shivendraraje Bhosale, Satara , Satara Palika, Satara Muncipal Council
Satara : गोडोली तळे परिसरात धर्मवीर संभाजीराजेंचा पुतळा बसविला जाणार : वृषालीराजे

वेळ आणि तारीख दोघांच्या सोयीची असावी

आम्ही यापूर्वीच समोर येण्याचे आव्हान अनेकवेळा दिले. परंतु त्यावेळी नसलेली शेपुट घालुन, कधीही आमचे आव्हान यांनी स्विकारले नाही आणि आता नव्याने आव्हान देत आहेत. निधी किती आणला याबाबतचे त्यांचे (शिवेंद्रराजेंचं) आव्हान आम्ही नम्रपणे स्विकारतो, परंतु त्याकरीता गांधी मैदान येथे आमने सामने झाले पाहीजे. वेळ आणि तारीख दोघांच्या सोयीची असावी. आम्ही तयार आहोत. कर नाही त्याला डर कश्याला पाहिजे असं उदयनराजेंनी नमूद केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Udayanraje Bhosale , Shivendraraje Bhosale, Satara , Satara Palika, Satara Muncipal Council
Satara Zilla Parishad : सातारा जिल्हा परिषद निवडणुकीसाठीची आरक्षण साेडत जाहीर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com