अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पावसामुळे भिंत कोसळून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
स्थानिकांनी घराखाली अडकलेल्या लोकांना वाचवले.
जखमींना सोलापूर सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
महसूल अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला.
राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. या परतीच्या पावसाचा फटका मराठवाडासह घाटमाथ्यवरील शहरांना सुद्धा बसला आहे. शेतकऱ्यांची काढणीला आलेली पिकं पावसाच्या पाण्याने खराब झाली आहेत. अशातच सतत पडणाऱ्या पावसामुळे सोलापुरातील अक्कलकोट येथे एका गावात सकाळी दहाच्या सुमारास भिंत कोसळली आहे. या दुर्घटनेत तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अक्कलकोट तालुक्यातील तोळणूर येथे सकाळी दहाच्या सुमारास सततच्या मुसळधार पावसामुळे चढावर असलेल्या अहमदपाशा पीरजादे पाटील यांची दगडी घराची भिंत लगत असलेल्या भारतीबाई उण्णद यांच्या घरावर कोसळली. या दुर्घटनेत भारतीबाई उण्णद यांच्या घरातील तिघा जणांना दगडाचा मार लागला.
दगडाच्या मारामुळे हे तिघेही जखमी झाले आहेत. या घटनेत भारतीबाई यांच्या घराचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. घरावर भिंत पडल्याने घरातील माणसांना बाहेर काढण्यासाठी स्थानिकांनी शर्थीचे प्रयत्न करून घराबाहेर काढले. स्थानिकांच्या सतर्कतेमुळे भारतीबाई उण्णद यांच्या कुटुंबावरचे हातावरचे संकट बोटावर निभावले आहे.
स्थानिकांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलावून जखमी अवस्थेत असलेल्या भारतीबाई उण्णद, प्रभुलिंग उण्णद, आणि भौरमा उण्णद या तिघांना उपचारासाठी अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. मात्र जखम गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी सोलापूर येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान ग्राम महसूल अधिकारी पी.व्ही. म्हेत्रे यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन पाहणी करून पंचनामा केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.