पुण्यातील भाजी विक्रेत्याने मुख्यमंत्री निधीस १.१३ लाख रुपयांचे दान केले.
या भाजी विक्रेत्याने दररोज शंभर रुपये साठवून पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला आहे
आईची शिकवण आणि समाजसेवेच्या भावनेतून दानाची प्रेरणा.
समाजासाठी खारीचा वाटा उचलणाऱ्या चरण वनवे यांच्या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.
गेल्या आठवड्यात राज्यात अनेक ठिकाणी पडलेल्या पावसामुळे मराठवाड्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य सरकारची मदत अजून शेतकऱ्यांना मिळाली नाही मात्र राज्यातील अनेक ठिकाणाहून समाजसेवी संस्था नागरिक मदत करत आहेत.त्या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांना मदत करत आहेत. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचे नुकसान झालं. मात्र पुण्यात शनिपार चौकात भाजी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या चरण वनवे यांनी राज्यातील पूरग्रस्तांना मदत करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री सहायता निधीला तब्बल एक लाख १३ हजार ७४० रुपयाचे दान केले आहे.
वनवे हे शंकर महाराजांचे निस्सीम भक्त आहेत. त्यांच्या घरातील महाराजांच्या पादुकांसमोर त्यांनी एक डबा ठेवलेला आहे. भाजी विक्रीतून आलेल्या रकमेपैकी दररोज शंभर रुपये ते या डब्यामध्ये साठवतात. आपदग्रस्तांना मदत करण्याच्या उद्देशानेच ही बचत केली जाते. वनवे यांनी पै पै करून साठवलेले एक लाख १३ हजार ७४० रुपये आज मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केले.
वनवे म्हणाले, "आमची तिसरी पिढी भाजी विक्रीचा व्यवसाय करते. माझ्या आईने कोरोनाच्या काळात गरजवंतांना एक लाख रुपयांची मदत केली होती. आपल्याकडील पैसा हा इतरांच्या कामाला यावा अन्यथा तो दुःखाचा डोंगर आहे, अशी आईची शिकवण होती. तिच्या पश्चात मी हा वारसा पुढे नेत असून नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदत करण्याच्या उद्देशाने दररोज शंभर रुपये बाजूला ठेवत आलो आहे. आज समाजाची गरज लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनानुसार मी खारीचा वाटा उचलला आहे."
वनवे यांनी केलेल्या कौतुकास्पद कामगिरीवर आमदार रासने म्हणाले, "अत्यंत गरीब परिस्थितीतही आपण समाजाचे काही देणे लागतो या नात्याने वनवे यांनी केलेली मदत लाख मोलाची आणि समाजाला प्रेरित करणारी आहे. पूरग्रस्तांना मदत करण्याच्या उद्देशाने कसबा मतदार संघातील अभियानाचा आम्ही आज यानिमित्ताने शुभारंभ केला. अधिकाधिक नागरिकांनी पूरग्रस्तांना मदत करावी असे आवाहन मी करतो."
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.