दुचाकी-टेम्पोच्या धडकेत 26 वर्षीय युवकाचा मृत्यू; अपघातानंतर मृतदेह 20 मिनिटे होता रक्ताच्या थारोळ्यात राजेश काटकर
महाराष्ट्र

दुचाकी-टेम्पोच्या धडकेत 26 वर्षीय युवकाचा मृत्यू; अपघातानंतर मृतदेह 20 मिनिटे होता रक्ताच्या थारोळ्यात

शहराला जोडणाऱ्या बहुतांश रस्ते अरुंद व दयनीय असल्याने मागील दोन ते तीन महिन्यापासून अपघाताची मालिका सुरूच असून दोन महिन्यात तब्बल आठ जणांनी अपघातात आपला जीव गमावला आहे.

राजेश काटकर

परभणी : जिंतूर शहरातील येलदरी रोडवरील वीट भट्टयां समोर दुचाकी आणि टेम्पो यांच्या समोरासमोर झालेल्या अपघातात दुचाकीवरील 26 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

अपघातात मयत युवक तालुक्यातील पिंपळगाव (का) येथील रहिवासी आहे. जिंतूर शहराला (Jintur City) जोडणाऱ्या बहुतांश रस्ते अरुंद व दयनीय असल्याने मागील दोन ते तीन महिन्यापासून अपघाताची मालिका सुरूच असून दोन महिन्यात तब्बल आठ जणांनी अपघातात आपला जीव गमावला असून अनेकजण गंभीररीत्या जखमी झाले आहेत.

त्यातच तालुक्यातील पिंपळगाव (का) येथील सचिन जानकीराम कऱ्हाळे (Sachin Janakiram Karhale) वय वर्ष 26 हा युवक दुचाकी क्रमांक MH22 AX 2886 वरून जिंतूरच्या दिशेने येत असतांना जिंतूर कडून एलदारीच्या दिशेने जात असलेल्या टेम्पोची वीट भट्टयां जवळ समोरासमोर जोराची धडक होऊन सचिन कऱ्हाळे याचा मृत्यू झाल्याने आणखीन एक मृत्यूची भर पडली आहे.

सदरील अपघात इतका भीषण होता की घटनास्थळावर सर्वत्र रक्त सांडला होता. अपघातानंतर जवळपास 20 मिनिटे युवक जागेवरच पडून होता. घटना घडताच टेम्पो चलाक टेम्पो घेऊन घटणास्थावरून पसार झाला होता. ग्रामीण रुग्णालयाला माहिती मिळाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते राम काजळे, नागेश आकात, वाहनचालक यांनी मयतास शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल केले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: दारूच्या नशेत पतीने जंगलात नेऊन पत्नीचा गळा दाबला - गडचिरोली

Most Expensive School: १ कोटी रुपये फी अन् शाही थाट, 'ही' आहे जगातील सर्वात महागडी शाळा

लालबाग परिसरात भयंकर अपघात, २ मुलांना भरधाव वाहनानं चिरडलं; चिमुकलीचा जागीच मृत्यू

Putin -Jinping Immortal: पुतीन आणि जिनपिंग अमर होणार? चीन-रशियाच्या राष्ट्राध्यक्षांकडे कोणती जडीबुटी?

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस दलाकडून हेल्पलाइन नंबर जारी

SCROLL FOR NEXT