Hospital/file Photos Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Hospital: राज्यातील रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालयांचा होणार कायापालट; धाराशिवमध्ये ५०० बेड्सचे रुग्णालय उभारण्यात येणार

MH Hospital Development News: आशियाई विकास बँकेने गेली काही वर्ष प्रलंबित ४ हजार कोटींचे कर्ज मंजूर केले असून त्यातून राज्यातील रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयांचा कायापालट केला जाणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

Dharashiv Hospital News:

आशियाई विकास बँकेने गेली काही वर्ष प्रलंबित ४ हजार कोटींचे कर्ज मंजूर केले असून त्यातून राज्यातील शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयांचा कायापालट केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 1200 कोटी रुपये तत्वत: उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे. यातून आकांक्षित जिल्ह्यांमध्ये अद्ययावत आणि दर्जेदार जिल्हा रुग्णालये उभारावीत असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत दिले. सुरुवातीला धाराशिव जिल्ह्यात 500 बेडसचे अद्ययावत जिल्हा रुग्णालय उभारण्याची कार्यवाही तत्काळ करण्याच्या सूचनाही त्यांनी आज दिल्या.

या बैठकीस आरोग्य मंत्री तानाजी सावंत तसेच आशियाई विकास बँकेचे अधिकारी व्हीसीद्वारे उपस्थित होते. राज्य सरकारने आशियाई विकास बँकेने दिलेल्या सूचनांप्रमाणे राज्य शासनाने प्रशासकीय सुधारणा केल्यामुळे हे प्रलंबित कर्ज मंजूर झाल्याचे प्रारंभी मित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांनी सांगितले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आशियाई विकास बँकेच्या या कर्जातून राज्यातील वैद्यकीय शिक्षणाचे तसेच आरोग्याच्या तृतीयक सेवेचे ( Tertiary Care) बळकटीकरण होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील यापूर्वी वारंवार आरोग्य यंत्रणेत आमुलाग्र बदल घडवून आणण्याचे उद्दिष्ट्य असल्याचे सांगितले आहे.  (Latest Marathi News)

सुधारणांमुळे कर्ज मंजुरीचा मार्ग मोकळा

आशियाई विकास बँकेने इतके मोठे कर्ज मंजूर करण्यापूर्वी सात प्रशासकीय व शैक्षणिक सुधारणा सुचवल्या होत्या. यासंदर्भात सध्याच्या राज्य शासनाने वेगाने पाऊले उचलल्यामुळे कर्ज मंजुरी शक्य झाली असे बँकेचे टीम लीडर डॉ निशांत जैन यांनी सांगितले. यामध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स, डिजिटल मेडिकल एज्युकेशन आणि हेल्थ पॉलिसी तसेच ई हॉस्पिटल, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन, मालमत्ता नियोजन , व्यवस्थापन आणि शाश्वतता धोरण, उमेदवार भरती कक्ष, औषध खरेदी अधिकाराचे विकेंद्रीकरण अशा सुधारणा शासनाने केल्या.

धाराशिव येथे सुसज्ज रुग्णालय उभारा

१५० मिलियन डॉलर्स म्हणजेच १२०० कोटी रुपये प्रकल्पाशी संबंधित बांधकामे, धोरणात्मक बाबींसाठी बँकेकडून देण्यात येणार असून ३५० डॉलर्स म्हणजेच २८०० कोटी रुपये बांधकाम आणि यंत्रसामुग्रीसाठी दिले जातील. सध्या अलिबाग येथे बांधकामासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरसाठी निविदा प्रक्रिया सुरु आहे.

आज आशियाई विकास बँकेने १२०० कोटींची तत्वत: मान्यता दिली. धाराशिव हा आकांक्षित जिल्हा असल्याने याठिकाणी ५०० बेड्सचे सुसज्ज जिल्हा रुग्णालय उभारण्यासाठी तातडीने निविदा प्रक्रिया राबवावी व कार्यवाही करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी बैठकीदरम्यान दिले. परभणी येथे देखील जिल्हा रुग्णालय उभारण्याचे विचाराधीन आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेची शाळांची दयनीय अवस्था

Health Insurance: आता २४ तास अ‍ॅडमिड होण्याची गरज नाही; केवळ २ तास रूग्णालयात राहूनही मिळणार क्लेम

Maharashtra Politics : तुमचा मालक बाटगा, गळ्यात काँग्रेसचं मंगळसूत्र अन् टिळा शरद पवारांचा; रामदास कदमांचा ठाकरेंवर तिखट वार

Pune : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडलं झुरळ, कॅम्प परिसरातील हॉटेलमधील किळसवाणा प्रकार समोर

Parbhani : शेती मशागत करताना दुर्दैवी घटना; कोळपणी करताना विद्युत तारेला स्पर्श, शेतकऱ्यासह दोन बैलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT