tomato Saam Tv
महाराष्ट्र

Kolhapur Tomato Theft: कोल्हापुरात 50 हजारांच्या टोमॅटोवर डल्ला; पाऊस आणि अंधारांचा फायदा घेत क्रेट लांबवले

Kolhapur Tomato News: कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड येथील शेतकरी अशोक मस्के यांच्या शेतातली 50 हजारांच्या टोमॅटोची चोरी झाली आहे.

Shivani Tichkule

Kolhapur News: कुठेही चोरी झाली म्हटलं की मौल्यवान वस्तू, दागिने आणि रोकड चोरीला गेल्याचे समोर येते. मात्र चोरटे कधी टमाटर (Tomato) ही चोरी करतील असा कोणी विचार केला नव्हता. एरवी सहज उपलब्ध होणारा आणि दररोज भाज्यांमध्ये दिसणारा टोमॅटो आता सर्वसामान्यांच्या आवाक्या (Gondia) बाहेर गेल्याने चोरांनी चक्क टोमॅटो चोरीलाही सुरुवात केली आहे. असाच एक प्रकार कोल्हापुरात उघडकीस आला. (Maharashtra News)

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात हिरवाड गावचे शेतकरी अशोक मस्के हे दरवर्षी भाजीपाल्याची शेती करतात. यंदा 30 गुंठ्यामध्ये त्यांनी टोमॅटोची लागवड केलेली आहे. सध्या महाराष्ट्रात टोमॅटोचे दर गगनाला भिडलेले असताना अज्ञात चोरट्याने अशोक मस्के यांच्या शेतातील 20 ते 30 कॅरेट टोमॅटोची चोरी केलेली आहे.

अंदाजे 60 ते 70 हजार रुपये किंमत या टोमॅटोची होत आहे. अशोक मस्के यांनी संपूर्ण शेती परिसरात सीसीटीव्ही लावला आहे. मात्र कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने सीसीटीव्हीची नजर चुकवत रात्रीच्या अंधारात या चोरट्याने चक्क टोमॅटोवर डल्ला मारलेला आहे.

गोंदियात टोमॅटो चोरी

गोंदिया शहरातील भाजी बाजारातील किशोर धुवारे यांचा भाजी विक्रीचा ठोक व्यवसाय आहे. २३ जुलैला रात्री दुकान बंद करून किशोर धुवारे घरी गेले. मागील पंचवीस वर्षांपासून भाजीचा व्यवसाय करणाऱ्या किशोर धूवाऱ्यांना साधी कल्पनाही नव्हती केली की त्यांच्या भाजीच्या दुकानातून कधी टोमॅटो चोरीला जातील. २४ जुळायला नेहमीप्रमाणे सकाळी दुकान उघडल्यानंतर त्यांना आश्चर्याचा झटका बसला. त्यांच्या दुकानाच्या शटरचे लॉक तोडले होते. आत असलेले टोमॅटो चोरीला गेल्याचे दिसले. 

चोरट्यांनी जवळपास तीन ते चार हजार रुपयाचे टोमॅटोसह मिरची आणि रोकड ही चोरीला गेल्याची तक्रार त्यांनी गोंदिया पोलीस स्टेशनमध्ये दिली. टोमॅटो चोरीची ही घटना बाजारपेठेतील दुसऱ्यांदा घडली आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी तपास करून चोराला अटक केली आहे. मात्र टमाट्याचे दर हे गगनाला भिडले असल्याने कधी नव्हे ते बाजार आता आमच्या दुकानात पिवळ्या लागल्या आहेत.  त्यामुळे पोलिसांनी रात्रीला भाजी बाजारामध्ये गस्त वाळवावी अशी विनंती या भाजी व्यापाऱ्यांनी केलेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 Live News: मुंबईकर रिकाम्या हातीच परतले! रहाणे, शार्दुल अन् पृथ्वी शॉ अन्सोल्ड

Dheeraj Deshmukh News : .. अन् धीरज देशमुख यांच्या कार्यकर्त्यांना झाले अश्रु अनावर|VIDEO

Maharashtra News Live Updates: सुरेश धस यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांना अटक करा; आष्टी तालुका बंदचा दिला इशारा

चणा डाळीचे crispy कबाब कधी खाल्लेत का?

Married Women: लग्न झालेल्या महिला पायात जोडवी का घालतात? जाणून घ्या कारण...

SCROLL FOR NEXT