Pune Dam Water Level 2023: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, आज पाणीकपात रद्द होणार? धरणांमध्ये जमा झाला मोठा पाणीसाठा

Pune Dam Water Level News: पुण्यातही पावसाच्या सरी बरसत असून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात मोठा पाणीसाठा जमा झाला आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणातील एकत्रित पाणीसाठा वाढला आहे.
Pune Dam Water Level Status Today 29 July 2023
Pune Dam Water Level Status Today 29 July 2023Saam TV
Published On

Pune Dam Water Level Status Today 29 July 2023: बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यानुळे राज्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली. सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असून नद्या-नाले तुडूंब भरून वाहत आहेत. काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.

दरम्यान, पुण्यातही पावसाच्या सरी बरसत असून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात मोठा पाणीसाठा जमा झाला आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणातील एकत्रित पाणीसाठा वाढला आहे.

Pune Dam Water Level Status Today 29 July 2023
Mumbai Local Mega Block: मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

पाणलोट क्षेत्रात अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत असल्याने धरणसाठ्यात वाढ झाली आहे. खडकवासला धरण भरल्याने त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता या प्रकल्पात एकूण २१.१८ टीएमसी (७२.६५ टक्के) इतका पाणीसाठा जमा झाला होता.

खडकवासला धरणसाखळीत गेल्यावर्षी इतका पाणीसाठा जमा झाल्याची माहिती आहे. गेल्या वर्षी २८ जुलै रोजी प्रकल्पात २१.४६ टीएमसी इतका पाणीसाठा झाला होता, गुरुवारी सायंकाळी पावसाचा जोर वाढल्याने खडकवासला धरणातून ३४२४ क्युसेस वेगाने मुठा नदीत पाणी सोडले जात होते.

मात्र, शुक्रवारी पावसाचा जोर कमी झाल्याने दुपारी एक वाजता विसर्ग बंद करण्यात आला. होता. दरम्यान, पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये टेमघर धरणात १.९६ (५२.८१) टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

Pune Dam Water Level Status Today 29 July 2023
Buldhana Bus Accident: बुलढाण्यात दोन खासगी बस एकमेकांना धडकल्या; भीषण अपघातात ६ प्रवाशांचा जागीच मृत्यू

याशिवाय वरसगाव धरणात ९.०२ (७०.३७ टक्के) टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. तर पानशेत धरणात ८.३० (७७.९५) टीएमसी, खडकवासला धरणात १.९० टीएमसी (९६.१७ टक्के) पाणीसाठा जमा झाला आहे.

विशेष बाब म्हणजे गेल्या २८ दिवसांत पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये १५ टीएमसी पाणीसाठ्याची भर पडली आहे. एकीकडे धरणातून पाणी सोडले जात असतानाही पुणेकर मात्र, पाणीकपातीमुळे हैराण झाले आहेत.

आता ही पाणीकपात रद्द करावी, अशी मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आज दुपारी १२ वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थितीत एक बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत पाणीकपात रद्द केली जाणार असल्याची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com