Nagpur school Bus Stuck on Track : Saam tv
महाराष्ट्र

Nagpur School Bus Stuck on Track : भरधाव ट्रेनसमोर अडकली स्कूल बस; 40 विद्यार्थ्यांच्या पोटात गोळा, पुढे नेमकं काय घडलं? पाहा व्हिडिओ

साम टिव्ही ब्युरो

भरत मोहोळकर, साम टीव्ही प्रतिनिधी

नागपूर : बस चालकाच्या बेजबाबदारपणामुळे अनेक अपघात घडतात. मात्र नागपुरात अशाच अताताई स्कूल बसचालकामुळे 40 विद्यार्थी जीवाला मुकले असते....नागपूरच्या खापरखेड्याजवळ रेल्वे क्रॉसिंग आहे....छिंदवाडा एक्स्प्रेस येण्याची वेळ झाल्यामुळे रेल्वे गेट बंद करण्यास सुरूवात झाली. मात्र त्याचवेळी एक भरधाव स्कूलबस आली. या स्कूल बस चालकानं ना आव पाहिला ना ताव बस थेट पहिलं गेट चूकवत रेल्वे रुळावर नेली.

बस रूळ क्रॉस करण्यापूर्वीच दुसरं गेट बंद झालं. ही बस मध्येच रुळावर अडकून पडली. या बसमधून एक दोन नव्हे तर तब्बल 40 विद्यार्थी प्रवास करत होते. सर्वांच्या पोटात गोळा आला. कारण अपेक्षेप्रमाणे समोरून छिंदवाडा एक्स्प्रेस भरधाव वेगानं चाल करून येत होती. सर्वच गोंधळले...काय करावं कुणाला काही सूचेना...मात्र रेल्वे गेटजवळ असलेल्या एका सजग नागरिकानं रस्त्यावर असलेलं एक लाल बॅरिकेड रेल्वे रुळावर टाकलं आणि एक्स्प्रेसच्या लोकोपायलटनं तातडीनं प्रसंगावधान दाखवत काही मीटर अंतरावत ही भरधाव एक्स्प्रेस मोठ्या खुबीनं थांबवली आणि 40 विद्यार्थ्यांचा जीव वाचला.

सजग नागरिक आणि लोकोपायलटच्या प्रसंगावधानामुळे ही मोठी दुर्घटना टळलीय. मात्र यामुळे अनेक गंभीर प्रश्नही उपस्थित झाले आहेत. एवढ्या मुलांचा जीव धोक्यात घालून गेट बंद होत असताना चालकाला बस दामटवण्याची गरजच काय होती.

तर दुसरीकडे खापरखेडा रेल्वे क्रॉसिंगजवळ उड्डाण पुलाची मागणी आहे. ती आता तरी पूर्ण होणार का? कारण असा प्रसंग पुन्हा घडला तर पुन्हा वेळ आणि नशिब साथ देईलच असं नाही. त्यामुळे चालकांनीही सजग राहण्याची गरज असून असे प्रसंग टाळण्यासाठी प्रशासनानंही रस्ते वाहतुकीच्या सुविधा निर्माण करणं गरजेचं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : आज 'या' 5 राशींवर होणार गणरायाची कृपा, मिळणार गोड बातमी

Kalyan Crime : धक्कादायक! दिव्यांग दाम्पत्याच्या बाळाला विकण्याचा प्रकार; डॉक्टरचं कृत्य उघडकीस, कल्याणमधील खळबळजनक घटना

Manoj Jarange Patil: 'आरक्षण न दिल्यास फडणवीस जबाबदार' विधानसभा तोंडावर जरांगेंचा सहाव्यांदा उपोषणाचा एल्गार

Fact Check : डीजेमुळे फाटल्या व्यक्तीच्या मेंदूच्या नसा? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics: मुख्यमंत्र्यांचं ठरलं, स्ट्राईकरेटवर अडलं? शिंदेंचा फॉर्म्युला भाजप, अजित पवार गट स्वीकारणार? वाचा...

SCROLL FOR NEXT