Latur News Saam Tv
महाराष्ट्र

तीन महिन्यांत 22 घरफोड्यांचा उलगडा; तब्बल एक कोटीचा मुद्देमाल जप्त

अटकेतील आरोपींकडून तब्बल १ कोटी ६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दीपक क्षीरसागर

लातूर - शहरासह जिल्ह्यातील विविध पोलीस (Police) ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्यांची उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाला यश आले आहे. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात तब्बल २२ घरफोड्यांचा छडा लावण्यात आला आहे. अटकेतील आरोपींकडून तब्बल १ कोटी ६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हे देखील पहा -

लातूर शहरातील गांधी चौक, शिवाजीगनर, एमआयडीसी, गांधी चौक आणि लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यांसह जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दिवसा घरफोड्या, जबरी चोऱ्या आणि इतर चोरीच्या घटना घडल्याची नोंद पोलीस दप्तरी आहे. या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाला विशेष सूचना केल्या. या गुन्ह्यांची उकल करण्याबाबत त्यांनी आदेश दिले.

गुन्हेगारांच्या शोधासाठी पोलीस पथक तैनात तैनात करण्यात आली. गुन्हेगारांची कुंडली शोधत असताना, काहींची माहिती हाती लागली. दरम्यान, ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची झाडाझडती घेतली असता, जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील गुन्ह्यांचा उलगडा झाला जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात एकूण २२ घरफोड्यांची उकल करण्यात आली. ७ जबरी चोऱ्या दरोड्यांचा तपास करण्यात यश आले आहे. तर, ११ इतर चोऱ्यांचा छड लावण्यात आला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Lip Care : थंडीत ओठ फुटले; वापर 'ही' सिंपल ट्रिक, ओठ राहतील कायम मुलायम-गुलाबी

सुलेखन क्षेत्रात भारताचा डंका! अक्षया ठोंबरे यांना मिळाला जागतिक स्तरावरील सर्वोच्च सन्मान

Death Signs: मृत्यूच्या २४ तासाआधी दिसणारी तीन प्रमूख लक्षणे जाणून व्हाल थक्क; तज्ज्ञांनी दिली माहिती

Maharashtra Live News Update: नेव्हल डॅकमध्ये बॉम्बस्फोटाच्या धमकीचा फोन, परिसरात सर्च ऑपरेशन

Priyanka Chopra: देस गर्ल प्रियांकाचा आइवरी लेहेंग्यातील लूक व्हायरल, पाहा PHOTO

SCROLL FOR NEXT