शरद पवार यांनी पुन्हा एकदा साधला काश्मीर फाइल्सवर निशाणा

काश्मीर फाईल्स म्हणजे प्रोपगंडा
Sharad Pawar
Sharad PawarSaam Tv

कोल्हापूर - शरद पवार यांनी पुन्हा एकदा या काश्मीर फाइल्स या चित्रपटावरुन सुरु असलेल्या राजकारणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. आज शरद पवार (Sharad Pawar) कोल्हापूर (Kolhapur) दौऱ्यावर असून त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक मुद्द्यांवर संवाद साधला.

यावेळी शरद पवार म्हणाले की, काश्मीर फाईल्स जेंव्हा घडलं तेंव्हाच्या सरकारला भाजपचाच पाठिंबा होता. कश्मिर फाइल्स फिल्म काढली ती कुणीही पाहिली तर कुणालाही अन्य धर्मीयांबद्दल संताप येईल आणि लोक कायदा हातात घेतील, अशी रचना केली आहे असे ठाम मत शरद पवार यांनी मांडत भाजपवर जोरदार शब्दांत हल्ला चढवला.

हे देखील पहा -

या चित्रपटात जे काही दाखवले जात आहे ताे काळ काेणता हाेता. तर ताे काॅंग्रेसचा काळ हाेता. सामाजिक तेढ निर्माण करणे केला जात आहे असेही पवार यांनी नमूद केले. सामाजिक ऐक्य बिघडावं अस वक्तव्य आणि भूमिका सत्ताधारी पक्षाने (केंद्रातील) घेतलं आहे. त्यामुळे वेगळं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

ही फिल्म खऱ्या गाेष्टींवर आधारित नाही. आत्ता कोल्हापूरच्या निवडणूकित ही फिल्म दाखवली जात असेल असे पवार यांनी विचारातच माध्यम प्रतिनिधींनी हाे हाे, असे सांगताच पवार यांनी अशा गोष्टींवर त्यांचा (भाजप) विश्वास आहे, कामावर नाही अशी टिप्पणी केली.

राज्यपालांच्या हातांत कश्मिची सूत्रे गेली आणि त्या काळात विशिष्ट समाजावर हल्ले केले. पाकिस्तान बरोबर जायचं नाही अशी भूमिका घेणाऱ्या मुस्लिमांवर हल्ले केले आणी हिंदू वरही हल्ले झाले. त्यांना संरक्षण देणाची जबाबदारी राज्य कर्त्यांची होती. हा चित्रपट खऱ्या वर आधारित नाही असे देखील शरद पवार यावेळी म्हणाले.

Sharad Pawar
Kolhapur: राज ठाकरे उत्तम व्याख्याते; शेलक्या शब्दांत शरद पवारांनी घेतला समाचार

पुढे शरद पवार म्हणाले की, ज्यावेळी ही घटना घडली तेंव्हा राज्यकर्ते कोण होते? ही कधीची घटना होती? विश्वनाथ प्रताप सिंग पंतप्रधान होते आणि भाजपचा पाठिंबा होते. त्यांच्या काळात मुफ्ती महंमद सिंग भाजपच्या पाठिंब्यांने मंत्री होते. अशी दिशाभूल करणारी फिल्म पहा, असं जर देशाचा प्रमुखच सांगत असेल, सत्ताधारी पक्ष लोकांना चित्रपटाची तिकीटे वाटत असेल तर हा सरळ सरळ सांप्रदायिक भेदाभेद निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न असून त्यातून राजकीय फायदा मिळवला जात आहे. हे देशाच्या दृष्टीने चांगलं नाही अशी खंत शरद पवार यांनी व्यक्त केली.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com