Maharashtra Board HSC 12th Result 2025 Declared : बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने मानसिक तणावात आलेल्या १७ वर्षीय विद्यार्थिनीने आयुष्याचा दोर कापला. तिने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना यवतमाळ तालुक्यातील पांढुर्णा येथे घडली. हिना ज्ञानेश्वर आडे असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकताच बारावीचा निकाल जाहीर केला. या निकालात हिनाला अपेक्षित यश न मिळाल्याने ती निराश झाली होती. दुपारच्या सुमारास घरी कुणीही नसताना तिने पंख्याला गळफास लावून जीवनयात्रा संपवली. तिचे कुटुंबीय यवतमाळ येथे लग्न समारंभासाठी गेले होते. घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला, ज्यामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.घटनेची माहिती मिळताच यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिस तपास करत आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आली. या परीक्षेचा निकाल आज सोमवारी दि. 5 मे 2025 रोजी मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी आणि सचिव देविदास कुलाळ यांनी जाहीर केला. या परीक्षेत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य, व व्यवसाय व आयटीआय या शाखांसाठी एकूण 14,27,085 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,97,969 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी 13,02,873 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेची ही टक्केवारी 91.88 आहे. सर्व विभागीय मंडळांमधून कोकण विभागाचा निकाल 96.74 टक्के इतका सर्वाधिक आहे.
टीप: आत्महत्या हे कोणत्याही समस्येचं समाधान नाही. मानसिक तणाव किंवा नैराश्य वाटत असल्यास कृपया तज्ज्ञांची मदत घ्या. हेल्पलाइन: AASRA – 91-9820466726 | iCall – 9152987821 तुमच्या भावना समजून घेणारे आणि मार्गदर्शन करणारे लोक तुमच्यासोबत आहेत. त्यामुळे कोणताही टोकाचा निर्णय घेण्याआधी हजार वेळा विचार करावा...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.