Social Media Posts  Saam Tv
महाराष्ट्र

Social Media Posts: आक्षेपार्ह 'सोशल पोस्ट'चा भार सोसना! ४ वर्षांत १५, ४०० नको त्या पोस्ट, ५९ टक्के थेट डिलिटच केल्या!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Objectionable Posts In Maharashtra

सोशल मीडियावर रोज अनेक पोस्ट शेअर केल्या जातात. यापैकी बऱ्याच पोस्ट या आक्षेपार्ह असतात. या पोस्टमधून द्वेषयुक्त भाषण, मॉर्फ केलेल्या प्रतिमा, माजी किंवा वर्तमान राजकीय नेत्यांचे व्हिडिओ आणि अफवा पसरवणे, चुकीची माहिती देण्यात येते. अशाच पोस्ट (Social Media Posts) आता शोधून डिलिट करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र सायबर एजन्सीने ही कामगिरी बजावली आहे. (Latest Marathi News)

महाराष्ट्र सायबर ही सायबर सुरक्षा राखण्यासाठी राज्य सरकार अंतर्गत स्थापन करण्यात आलेली एक एजन्सी आहे. ही एजन्सी सोशल मीडिया विश्लेषण आणि देखरेख कक्षांतर्गत दररोज ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर चालू विषयांवरील हॅशटॅग शोधते. जसे की, मराठा आरक्षण आंदोलन किंवा अयोध्येतील प्रभू रामाचा अभिषेक समारंभ. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आक्षेपार्ह पोस्ट शोधल्या जातात

यामध्ये जर आक्षेपार्ह पोस्ट आढळल्या, तर त्या हटवण्यासाठी कायदेशीर स्वरूपात मध्यस्थांना कळवले जाते. त्यानंतर या खातेधारकांवर कारवाई केली जाते. अनेकदा असे खाते बंद केले जाते. महाराष्ट्र सायबर विभागाने याबाबत अहवाल दिला आहे. मागील चार वर्षांत आढळलेल्या ९,१६३ आक्षेपार्ह पोस्टपैकी ६७% पोस्ट X ने, १८% इंस्टाग्राम आणि १२% फेसबुकने हटवल्या आहेत.

गेल्या वर्षी अकोल्यातील एका व्यक्तीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका चित्रपटाचा स्क्रीनशॉट शेअर केला होता. यामुळे इतरांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या होत्या. त्यामुळं सुरूवातीला शाब्दिक बाचाबाची झाली अन् अखेरीस रस्त्यावर हिंसाचार (Objectionable Posts) झाला. या दंगलीत एकाचा मृत्यू झाला आणि काही लोक जखमी झाले होते. एफआयआर नोंदवण्यात आली होती. परंतु जोपर्यंत ऑनलाइन पोस्ट काढून टाकली जात नाही, तोपर्यंत हिंसाचार सुरूच राहू शकतो, अशी चिन्हं दिसत (Social Media Objectionable Posts) होती. त्यानंतर अकोला पोलिसांनी महाराष्ट्र सायबर एजन्सीशी संपर्क साधला. सायबर एजन्सीने मध्यस्थाशी संवाद साधला आणि त्यांना पोस्ट काढून टाकण्यासाठी राजी केले होते.

महाराष्ट्र सायबर एजन्सीने सामाजिक तणाव निर्माण करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी स्थानिक पोलिसांनाही मदत केली आहे. यवतमाळमधील एका घटनेत, एक इंटरनेट वापरकर्ता दर शुक्रवारी जातीयदृष्ट्या संवेदनशील संदेश पोस्ट (Social Media Posts) करत होता. त्यामुळं परिणामी सामाजिक तणाव निर्माण झाला होता. तो सारखा त्याचा पत्ता (IP) बदलत होता. त्यामुळं स्थानिक पोलिसांना त्याचा माग काढणं कठीण झालं होतं. महाराष्ट्र सायबर अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांना गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी माहिती पुरवली होती.

कोरोना काळातही महाराष्ट्र सायबर एजन्सीने चुकीची माहिती पसरवणाऱ्या असंख्य पोस्ट ऑनलाइन ओळखल्या होत्या. त्याअनुषंगाने कारवाई देखील केली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime: मुंबईत १३ वर्षीय मुलावर शौचालयात लैंगिक अत्याचार; मुलुंड परिसरातील धक्कादायक प्रकार

Jasprit Bumrah: नाद करा पण बुमराहचा कुठं.. चेंडू सोडण्याच्या प्रयत्नात बांगलादेशी फलंदाजाची दांडी गुल- VIDEO

Smell Free Shoes Tips : बुटांचा खराब वास येत आहे? या टिप्सने दुर्गंधी होईल मिनिटांत छुमंतर

Sanjay Raut Video : मुख्यमंत्रीपदावरून मविआमध्ये वाद? राऊत काँग्रेसवर भडकले !

PM Vishwakarma Yojana: वर्षभरात ६ लाख लाभार्थी, २ कोटींपेक्षा जास्त लोकांनी केलेय रजिस्ट्रेशन, योजनेचा कसा घ्याल लाभ?

SCROLL FOR NEXT