Social Media : आक्षेपार्ह पाेस्ट प्रकरणी मानवतमध्ये एकावर गुन्हा दाखल

परभणी जिल्ह्यातील नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पाेलिसांनी केले आहे.
manvat police charged one for posting comment on social media in parbhani
manvat police charged one for posting comment on social media in parbhaniSaam TV
Published On

Parbhani Crime News :

समाज माध्यमातून (social media) आक्षेपार्ह पाेस्ट टाकल्याने परभणी (parbhani) जिल्ह्यात आज (गुरुवार) एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आक्षेपार्ह पाेस्टची तपासणी केल्यानंतर मानवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती परभणी जिल्हा पाेलिस दलाने दिली. दरम्यान नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पाेलिस दलाने केले आहे. (Maharashtra News)

परभणी जिल्ह्यात समाज माध्यमात गेल्या काही दिवसांपासून धार्मिक भावना दुखविण्याच्या हेतुने पाेस्ट येत हाेत्या. याबाबत स्वप्निल गुंडू यांनी पाेलिसांत तक्रार दिली हाेती. त्यानूसार पाेलिसांनी तपास केला.

manvat police charged one for posting comment on social media in parbhani
Success Story : काश्मिरी बोर लागवडीतून मिळाला बक्कळ पैसा, वाचा नांदेडच्या शेतकऱ्याची यशोगाथा

पाेलिसांनी समाज माध्यम वापरकर्त्यांचे पाेस्ट तपासल्या. त्यानंतर संबंधितावर गुन्हा दाखल केला. संबंधितावर कडक कायदेशिर कारवाई करावी अशी मागणी मानवत पाेलिसांना तक्रारदाराने केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान परभणी जिल्ह्यात कुठलीही अनुचित घटना घडू नये, शांतता, सुव्यवस्था कायम रहावी यासाठी नागरिकांनी काेणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पाेलिस दलाने केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

manvat police charged one for posting comment on social media in parbhani
Wardha Crime News : शाब्बास रे पठ्या... बालकाच्या धाडसाने वर्धेत नरबळीचा प्रयत्न फसला, महिलेवर गुन्हा दाखल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com