Crime : प्रेमा तुझा रंग कसा? एक्स गर्लफ्रेंडला ९ वेळा चाकूने भोसकलं, नंतर बॉयफ्रेंडने स्वत: आयुष्य संपवलं

youth killed ex girlfriend : एक्स गर्लफ्रेंडला ९ वेळा चाकूने तरुणाची हत्या केल्याची घटना घडली आहे.एक्स गर्लफ्रेंडची हत्या करून स्वत:ही आयुष्य संपवलं.
Belagavi News
youth killed ex girlfriend Saam tv
Published On

बेळगावमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधाला नकार दिल्याने तरुणाने बालपणीची मैत्रीण आणि एक्स-गर्लफ्रेंडला ९ वेळा चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना घडली. एक्स-गर्लफ्रेंडची हत्या केल्यानंतर तरुणाने स्वत:ही आयुष्य संपवलं. तरुणाच्या कृत्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

आनंद सुतार असे ३१ वर्षीय तरुणाचे नाव आहे. तर रेश्मा असे ३० वर्षीय तरुणीचे नाव आहे. बेळगावातील बीडी गावात ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Belagavi News
Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवात ७५ गोविंदा जखमी, काहींची प्रकृती गंभीर, एकाचा मृत्यू

काय आहे संपूर्ण प्रकरण?

रेश्मा आणि आनंद दोघेही बीडीगावात राहणारे होते. रेश्मा आणि आनंद बालपणीचे मित्र होते. दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं. दोघांच्या नात्याविषयी रेश्माच्या कुटुंबाला समजलं. त्यानंतर रेश्माचं लग्न त्याच गावातील शिवानंद नावाच्या तरुणाशी लावून दिलं.

आनंदचंही लग्न एका दुसऱ्या तरुणीशी लग्न झालं. लग्नानंतरही रेश्मा आणि आनंदमध्ये मैत्री कायम होती. मागील दोन वर्षांपासून दोघांमध्ये अनैतिक संबंध होते. दोघांचं प्रेम प्रकरण शिवानंदला ठाऊक झालं. त्यानंतर शिवानंदने पोलिसांत तक्रार दिली.

शिवानंदने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर आनंदला ताब्यात घेण्यात आलं. पोलिसांनी समज देऊन आनंदला सोडून दिलं. पोलिसांनी समज दिल्यानंतरही आनंद रेश्माशी बोलायचा प्रयत्न करायचा. शिवानंद घरात नसताना आनंद रेश्माला भेटायला जायचा.

Belagavi News
Narendra Modi : डोक्यावर संविधान ठेवून नाचणारे राजकारणी आधी पायदळी तुडवायचे; PM नरेंद्र मोदींचा विरोधकांवर निशाणा

रेश्मा टाळू लागल्याने आनंद वेडापीसा झाला. शिवानंद शुक्रवारी सकाळी गायीचं दूध काढण्यासाठी डेअरीमध्ये गेला होता. त्यावेळी आनंद घराच्या मागच्या दरावाजातून शिवानंदच्या घरात घुसला. घरात रेश्मा आणि तिची लहान मुलगी होती. घरात शिरल्यानंतर आनंदने रेश्माच्या पोटात ९ वेळा चाकू भोसकला. आनंदच्या हल्ल्यात रेश्माचा मृत्यू झाला. रेश्माच्या हत्येचा थरार तिच्या मुलीनेही पाहिला. जीवघेण्या हल्ल्यात रेश्माचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आनंदनेही घाबरून स्वत:वर ५-६ वेळा वार करत आयुष्य संपवलं. तरुणाच्या कृत्याने बेळगावमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com