
हाडे केवळ शरीराला उभं ठेवण्याचं काम करत नाहीत तर प्रत्येक अवयवाला त्यांच्या जागी टिकवून ठेवतात. हाडे हे शरीराचा आधारस्तंभ मानले जातात. मात्र अनेकदा आपण आपल्या नकळत चुकीच्या आहारामुळे हाडांना कमकुवत करण्याचं काम करतो. दैनंदिन आयुष्यातील काही खाद्यपदार्थ असे आहेत जे हाडांची ताकद हळूहळू कमी करत जातात.
तुम्ही जास्त मीठ खात असाल तर शरीरातून कॅल्शियम बाहेर टाकले जाते. त्यामुळे हाडांमधील कॅल्शियम कमी होऊन ती नाजूक व्हायला सुरुवात करतात. तसेच साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे शरीरात जळजळ वाढते आणि कॅल्शियम शोषणामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हाडांची वाढ होण्यात अडचणी येतात.
शीतपेयांचा समावेशसुद्धा हाडांसाठी घातक ठरतो. त्यामधील साखर आणि फॉस्फोरिक अॅसिड कॅल्शियमचे संतुलन बिघडवतात, ज्यामुळे हाडे लवकर झिजायला सुरुवात होते. याशिवाय चहा, कॉफी किंवा एनर्जी ड्रिंक्समध्ये असलेलं जास्त कॅफिन देखील कॅल्शियम शरीरातून बाहेर टाकायला मदत करते. दुधासोबत कमी प्रमाणात घेतलेलं कॅफिन सुरक्षित मानलं जातं, पण साखर आणि जास्त कॅफिनची जोड हाडांसाठी हानिकारक ठरते.
दारूचे सेवन हाडांवरही थेट परिणाम करतं. ते व्हिटॅमिन डीचं शोषण कमी करतं. त्यामुळे शरीर अन्नातून मिळणाऱ्या कॅल्शियमचा योग्य वापर करू शकत नाही. दीर्घकाळ मद्यपान केल्याने हाडे मजबूत करणाऱ्या पेशींची निर्मिती थांबते. त्यामुळे हाडे कमकुवत होऊन त्यांचं संरक्षणक्षमता कमी होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.