Sakshi Sunil Jadhav
तांदूळ, उडीद डाळ, मेथी दाणे, मीठ, तेल इ.
तांदूळ, उडीद डाळ व मेथी दाणे स्वच्छ धुऊन ६-७ तास भिजत ठेवा.
भिजवलेले तांदूळ व डाळ मिक्सरमध्ये बारीक दळून घ्या. मग ते फेटून रात्रभर झाकून ठेवा.
तवा गरम करून त्यावर थोडं तेल लावून १ पळी डोशाचं पीठ गोल आकारात पसरवा.
कडा कुरकुरीत हव्या असतील तर तेल कडेला पसरवून घ्या.
गरमागरम कुरकुरीत तांदळाचा डोसा नारळाच्या चटणी, सांबार किंवा बटाट्याच्या भाजीसोबत सर्व्ह करा.
पीठ जितके आंबलेले असेल तितका डोसा हलका व कुरकुरीत होतो.