Sakshi Sunil Jadhav
आज व्यवहाराच्या बाबतीत कुठेही साक्षीदार राहू नका. आपले कोण परके कोण ओळखून आज काम करणे जास्त बरे राहील.
मुळातच रसिक असणारी आपली रास काही गोष्टी खरेदी, मनोरंजन, स्वतःला आनंद वाटेल अशा गोष्टींच्याकडे आज कल राहील.
ध्यानीमनी नसताना आपल्याकडून इतरांना वेगळीच वागणूक दिली जाण्याची शक्यता आहे. त्याचे बालंट किंवा दोष आपल्याकडे येण्याची दाट शक्यता आहे.
मैत्रीमध्ये परिपूर्णता येतील. कदाचित स्त्री सखी कडून विशेष फायदा होण्याची दाट शक्यता आहे. परदेशी वार्तालाप होईल.
ताठ मानेने जगण्यासाठी विशेष प्रयत्न कराल. आपले वर्चस्व इतरांवर प्रस्थापित कराल. मग तुमचे कनिष्ठ असो अथवा वरिष्ठ.
विष्णू उपासना आज करावी. उत्तम फलित मिळणार आहेत. तीर्थक्षेत्रि भेटी होतील. कामाच्या ठिकाणी सुधारणा होतील.
सहज सुलभ गोष्टी करण्याकडे आज कल ठेवा. काळेधन, लाच लुचपत, भ्रष्टाचार यापासून आज स्वतःला जपलेले बरे.
न बोलता शांतपणे कामे करणारी आपली रास. कोर्टाच्या कामांमध्ये सहज यश मिळेल. कदाचित दमदाटीने कामे सहज होतील.
गुढघेशी निगडित, पायाशी निगडित आजार आज जपणे गरजेचे आहे. कोणतीही गोष्ट करत असताना योग्य निर्णयावर गेलात तर बरे राहील. शत्रुभय संभवते आहे.
शिव उपासना करावी. आपली सुजनशीलता आज वाढती राहील. शेअर्समधील गुंतवणूक फलदायी ठरेल.दिवस चांगला आहे.
प्रॉपर्टीशी निगडित व्यवहार होतील. घेतलेले निर्णय मधून अजून नवीन व्यवहार वाढण्याची दाट शक्यता आहे. शेतीवाडी मधून पैसा मिळेल.
सोबत असणाऱ्या व्यक्तींची विशेष काळजी घ्यावी लागेल. शेजाऱ्यांचे विशेष सहकार्य मिळेल. प्रेमामधून लाभ होतील.