Nagpur News Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur News: फुटबॉल मैदानात दगड फेकणं बेतलं जिवावर; मानेवर बुक्की मारल्यानं १४ वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू

Nagpur News: शनिवारी दुपारी इब्राहिम फुटबॉल मैदानाच्या बाजुला असलेल्या वडाच्या झाडाखाली बसून खेळ पहात होता.

Bharat Jadhav

Nagpur News:

वाद झाल्यानंतर मानेवर बुक्की मारल्याने एका १४ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना नागपूरमधील गरीब नवाज नगरमध्ये घडली. मृत झालेल्या मुलाचं नाव मोहम्मद इब्राहिम मोहम्मद फिरोज शेख असं आहे. याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार फुटबॉल खेळणाऱ्या समवयीन मुलासोबत वाद झाला त्यानंतर त्यांच्या मारामारी झाली. त्यात फुटबॉल खेळणाऱ्या मुलाने मोहम्मद इब्राहिम मोहम्मदच्या मानेवर एका बुक्का मारला. (Latest News)

त्यात इब्राहिमचा मृत्यू झाला. या प्रकरणी यशोधरानगर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केलीय. मृत मोहम्मद इब्राहिम मोहम्मद फिरोज शेख मुलगा आणि वाद झालेला मुलगा हा एकाच परिसरात राहतात. दोन्ही मुलांचे आई-वडील हॅण्डलूम कारखान्यात काम करतात. शनिवारी दुपारी इब्राहिम फुटबॉल मैदानाच्या बाजुला असलेल्या वडाच्या झाडाखाली बसून खेळ पहात होता. यावेळी तो लहान-लहान दगड उचलून मैदानावर फेकत होता. फुटबॉल खेळणाऱ्या मुलाने त्याला मैदानावर दगड फेकण्यास मनाई केली. यावरून दोघात वाद झाला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दोघांमध्ये धक्काबुक्की झाली. यात फुटबॉल घेणाऱ्या एका मुलाने रागाच्या भरात इब्राहिमच्या मानेवर बुक्की मारली. त्यानंतर इब्राहिम जमीनवर पडला. त्यानंतर वाद करणारा मुलगा परत फुटबॉल खेळू लागला. मानेवर जारोचा मार लागल्याने इब्राहिमचा मृत्यू झाला होता. इब्राहिम जमिनीवर पडून राहिल्याने सर्व मुले घाबरली. काहींनी घरी पळ काढला.

काही मुलांनी इब्राहिमच्या आईला घटनेची माहिती दिली. इब्राहिम बेशुद्ध झाल्याचं पाहून इब्राहिमच्या कुटुंबियांनी त्याला मायो हॉस्पीटलमध्ये दाखल केलं. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली, पोलिसांनी अस्कमात मृत्यूची नोंद केलीय. याप्रकरणाचा तपास सुरू आहे. परंतु प्राथमिक तपासात हत्येचा हेतू नसल्याचं निष्पन्न झालं असल्याचं यशोधरा पोलीस स्टेशनमधील वरिष्ठ पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर भेदोडकर यांनी सांगितलं.

इब्राहिमच्या कुटुंबियांनी परिसरातील मुलांकडे विचारपूस केली. त्यावेळी एकाने सांगितले की, इब्राहिमच्या मानेवर बुक्की मारल्याने तो बेशुद्ध पडला. यानंतर वडील फिरोज यांनी घटनेची माहिती यशोधरानगर पोलिसांना दिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

Uddhav Thackeray: राजीनाम्यानं चालणार नाही, तर सरकार बदला; जंतर मंतरवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू; दुचाकीस्वाराला वाचवताना अनर्थ घडला!

राहुल-प्रियंका गांधींना 3 तासांनी पोलिसांनी सोडलं; सुटकेनंतरचा पहिला व्हिडिओ

Fact Check: देशातल्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनवर दगडफेक? CJP समर्थकांकडून हायड्रोजन ट्रेन टार्गेट?

SCROLL FOR NEXT