Delhi Crime News: भरदिवसा माय-लेकीवर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न; घटनेनं दिल्लीत खळबळ

Delhi Crime News: देशभरात सध्या दिवाळीची धामधुम सुरू आहे. अशातच दिल्लीतील अलीपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
Delhi Crime News:
Delhi Crime News: saam tv
Published On

Delhi Crime News

देशभरात सध्या दिवाळीची धामधुम सुरू आहे. अशातच दिल्लीतील अलीपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जमिनीच्या वादातून आई- मुलीवर गोळ्या झाडून हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Delhi Crime News:
Delhi Crime News: प्रेम, जादू अन् खून ... प्रियकरासाठी स्वित्झर्लंड सोडून आली भारतात, घडलं भलतच

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, रविवारी (१२ नोव्हेंबर) रोजी ही धक्कादायक घटना घडली. अलीपूरच्या श्याम कांताजवळील खेरा कलानच्या परिसरात माय लेकीची हत्या करण्याचा प्रयत्न झाला.

रविवारी दिवाळीनिमित्ताने पूजेसाठी गेलेल्या आई-मुलीवर त्यांच्या शेतात अज्ञात व्यक्तीकडून गोळ्या झाडण्यात आल्या. यात दोघीही गंभीर जखमी झालेल्या आहेत. जखमी झालेल्या पीडितांची नावे (वय४५) राकेश देवी आणि (वय २२)मुलगी पिंकी अशी आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार, रविवारी दूपारी चारच्या सुमारास पोलिसांना दोन महिलांवर गोळीबार झाल्याची माहिती एका व्यक्तीकडून मिळाली. या घटनेची माहिती मिळताचं पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहचले. घटनास्थळावरुन काही काडतुसे सापडली. सदर घटना जमिनीच्या वादातून झाल्याचा पोलिसांना संशय आहे. २०१८ रोजी पीडित महिलेच्या पतीची त्याच्या मेहुण्याने जमिनीच्या वादातून हत्या केली होती.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी झालेल्या आई आणि मुलीला जवळील रुग्णालयात दाखल केले. सध्या दोघींची प्रकृती धोक्याबाहेर आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत. दाखल तक्रारीनुसार, पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केलाय

Delhi Crime News:
Delhi Crime News: हत्येनंतर अंगणात पुरलं, वरून नवीकोरी फरशी बसवली; प्रेयसीसाठी भयंकर कृत्य

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com