Latur News Saamtv
महाराष्ट्र

Latur News: कहरच! नारळ फोडून, रील बनवून दणक्यात परीक्षा केंद्रात एन्ट्री, लातूरच्या विद्यार्थ्यांचा व्हिडिओ व्हायरल

12th Board Exam: कालपासून बारावीच्या बोर्डाच्या (HSC Board Exam) परीक्षेस सुरूवात झाली आहे. सर्व विद्यार्थी परीक्षेचा जोरदार अभ्यास करण्यात, रिव्हिजन करण्यात व्यस्त आहेत.

Gangappa Pujari

संदिप भोसले, लातूर|ता. २२ फेब्रुवारी २०२४

latur Breaking News:

कालपासून बारावीच्या बोर्डाच्या (HSC Board Exam) परीक्षेस सुरूवात झाली आहे. सर्व विद्यार्थी परीक्षेचा जोरदार अभ्यास करण्यात, रिव्हिजन करण्यात व्यस्त आहेत. एकीकडे विद्यार्थी बारावी परीक्षेत चांगले मार्क मिळवून पास होण्याच्या तयारीत असतानाच लातूरमधून एक अजब प्रकार समोर आला आहे. लातूरमध्ये मुलांनी परीक्षेला जाण्याआधी चक्क नारळ फोडून परीक्षा केंद्रात प्रवेश केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काय आहे प्रकरण?

पोर कधी काय करतील याचा नेम कधीच नसतो. कालपासून बारावीच्या विद्यार्थ्यांचा पेपर सुरु झाला आहे. परीक्षा केंद्रातील अनेक बातम्या माध्यमांवर समोर येत आहे. अशातच लातूरमधील मुलांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

लातूरमधील एका बारावीच्या परीक्षा केंद्रावर परिक्षेला जाताना विद्यार्थ्यांनी पेपर सोडवण्यासाठी आणलेल्या पॅडची चक्क पुजा करत नारळ फोडला. यावेळी विद्यार्थ्यांनी इंस्टाग्रामवर रील देखील बनवला. यावेळी हटके एन्ट्रीत परीक्षा केंद्रावर पोरांनी प्रवेश केला. बारावीचा पहिला पेपर इंग्रजीचा असल्याने विद्यार्थ्यांनी आपला इंग्रजीचा पेपर सोपा जावा म्हणून हा प्रकार केल्याच बोलले जात आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये मुलांनी पेपरसाठी आणलेले पॅड एका रांगेत ठेऊन त्याचे नारळ फोडून पूजन केले. तसेच सर्वांनी आपल्या पॅडच्या पाया पडूनच परीक्षा केंद्रात प्रवेश केला. यावेळी काही मुलांकडून जोरदार जल्लोषही करण्यात आल्याचे दिसत आहे. विद्यार्थ्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Latest Marathi News)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik : कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक; अधिकारी न भेटल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कांदे फेकून आंदोलन

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Amit Shah : 'पहलगाम हल्ला करणारे तिन्ही दहशतवादी मारले', शाहांकडून संसदेत माहिती | VIDEO

Dream Psychology: स्वप्नात वारंवार अपघात पाहण्याचे संकेत काय?

Mrunal Thakur: तुझं सौंदर्य पाहून चंद्रही लाजेल...

SCROLL FOR NEXT