कॉपीमुक्त अभियानाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त आणि सुरक्षेच्या वातावरणात राज्यात बुधवारपासून (२१ फेब्रुवारी) इयत्ता बारावीची परीक्षा सुरू झाली. पण पहिल्याच दिवशी राज्यात कॉपीबहाद्दरांचा सुळसुळाट पाहायला मिळाला. इंग्रजी विषयाच्या पेपरला कॉपी करताना भरारी पथकाने राज्यभरात ५८ विद्यार्थ्यांना रंगेहाथ पकडलं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
विशेष बाब म्हणजे, बारावीच्या परीक्षेमधील (HSC Exam) गैरप्रकार टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभागाकडून राज्यभरात विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात आली होती. मात्र, असं असून सुद्धा पहिल्याच पेपरदरम्यान पालकांकडून कॉपी पुरवण्याचा तसेच विद्यार्थ्यांकडून कॉफी करण्याचा प्रकार समोर आला.
परीक्षा केंद्राच्या बिल्डिंगवर चढून पालक आपल्या पाल्यांना कॉप्या पुरवत असल्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. तर काही ठिकाणी विद्यार्थ्यांनी वेगवेगळी शक्कल लढवत परीक्षा केंद्रावर कॉप्या केल्या. (Latest Marathi News)
विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांची कसून तपासणी करुन त्यांना परीक्षा केंद्रात सोडण्यात आले होते. असे असतानाही भरारी पथकाला राज्यात इंग्रजीच्या पेपरला कॉपी करण्याची ५८ प्रकरणे सापडली. या विद्यार्थ्यांवर कारवाई केल्याचं पथकाकडून सांगण्यात आलं.
कॉफीबहाद्दरांची विभागनिहाय आकडेवारी बघितली, तर पुणे विभागात १५, छत्रपती संभाजीनगर विभागात २६, नाशिक विभागात ०२, लातूर विभागात १४, तर नागपूर विभागात ०१ विद्यार्थी कॉप्या करताना सापडले.
दरम्यान, बारावीच्या परीक्षेत कुठलाही परीक्षार्थी कॉपी करताना दिसला तर त्याच्यावर अॅक्शन घेतली जाणार जाईल, तसेच कॉपी करण्यास कोणी मदत करत असेल तर त्यावर सुद्धा कडक कारवाई केली जाईल, असा इशारा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.