Chandrapur News: वयोवृद्ध आई-वडिलांना खोलीत नेलं, कुऱ्हाडीने सपासप वार करत संपवलं; मुलाच्या क्रूरतेनं खळबळ

Chandrapur Crime News: शेतजमिनीच्या वादातून एका नराधम मुलाने जन्मदात्या आई-वडिलांवरच कुऱ्हाडीने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील लोणी गावात बुधवारी (२१ फेब्रुवारी) दुपारच्या सुमारास घडली.
Chandrapur Crime News
Chandrapur Crime NewsSaam TV
Published On

Son killed her Parents in Chandrapur

शेतजमिनीच्या वादातून एका नराधम मुलाने जन्मदात्या आई-वडिलांवरच कुऱ्हाडीने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील लोणी गावात बुधवारी (२१ फेब्रुवारी) दुपारच्या सुमारास घडली. या घटनेत आईचा जागीच मृत्यू झाला असून वडील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Chandrapur Crime News
Weather Forecast: विदर्भासह मराठवाड्यात पुढील ४८ तासांत मुसळधार पावसाचा इशारा; वाचा संपूर्ण वेदर रिपोर्ट...

याप्रकरणी पोलिसांनी (Chandrapur Police) नराधम मुलावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. मनोज पांडूरंग सातपुते (वय ४५) असं आरोपी मुलाचं नाव आहे. तर कमला पांडुरंग सातपुते असे मृतक आईचे नाव आहे.

या घटनेत पांडुरंग सातपुते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मनोज याने शेतीच्या वादातून बुधवारी वयोवृद्ध आई-वडिलांसोबत वाद घालत खोलीत नेलं. (Latest Marathi News)

तिथे ठेवलेल्या कुऱ्हाडीने त्याने अत्यंत क्रूरतेने आईच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करून आईला जागीच ठार केले. तर वडिलांच्या डोक्यावर दोन वार करून त्यांना गंभीर जखमी केले. यानंतर मनोज हा वहिनीला जीवे मारण्यासाठी तिच्या मागे धावला.

मात्र, ती एका खोलीत लपून वहिनीचे कसाबसा आपला जीव वाचवला. घटनेनंतर आरोपीने तेथून पळ काढला. याप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत मनोजला अटक केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Chandrapur Crime News
Petrol-Diesel Price: खुशखबर! कच्चा तेलाचे दर आपटले, महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलच्या नव्या किंमती जाहीर...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com