Buldana News संजय जाधव
महाराष्ट्र

खेळ बेतला जीवावर! १२ वर्षांच्या मुलाचा खेळताना रुमालाचा गळफास लागून मृत्यू

बुलढाण्यातील धक्कादायक घटना

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाणा: बुलढाण्यात (Buldana) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खांबाला रुमाल बांधून खेळत असताना रुमालाचा गळफास लागून एका १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना काल घडली आहे. खामगाव (Khamgaon) शहरातील (city) मीरा नगर परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. ही बाब आई वडिलांच्या लक्षात येताच त्यांनी मुलाला त्यातून बाहेर काढून रुग्णालयात (hospital) दाखल केले आहे.

हे देखील पाहा-

रुग्णालयात (hospital) पोहोचण्याअगोदरच मुलाचा मृत्यू झाला होता. पुर्वेश आवटे असे मृत मुलाचे नाव आहे. तो नेहमी मोबाईलवर (mobile) युट्युब, इन्स्टाग्रामवर (Instagram) सक्रिय राहत असल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी (family) यावेळी दिली आहे. पुर्वेश आवटे हा परिवारात एकुलता एक मुलगा होता.

या दुर्दैवी घटनेमुळे त्याचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गाव हेलावून गेले आहे. पुर्वेशने आईला मी अंगणात खेळतो असे सांगून बाहेर पडला होता. आडव्या लोखंडी खांबाला रुमाल बांधून खेळत असताना हा दुर्देवी प्रकार घडल्याचे समोर आले आहे. खामगाव पोलीस (Police) आता याची चौकशी करत आहे. दरम्यान या घटनेनंतर खामगावसह परिसरात खळबळ उडाली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pithla Bhakri Recipe: पावसाळ्यात रात्रीच्या जेवणासाठी बनवा झणझणीत पिठलं-भाकरी

दहशतवाद्यांच्या आकांना आता झोप येत नसेल; पंतप्रतधान नरेंद्र मोदी नेमके काय म्हणाले? VIDEO

Ratnadurga Fort : रत्नदुर्ग किल्ल्याचे दुसरे नाव काय? 99% लोकांना नसेल माहिती

Kitchen Vastu Tips: किचनमधून आजच बाहेर काढा 'या' गोष्टी, पैशांची कमतरता होईल दूर

Maharashtra Live News Update: रांजणगावजवळ लोखंडी रोडने एसटी वाहकावर हल्ल्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT