Mumbai: दोन वर्षांनंतर मंत्रालयाचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी खुले...

Maharashtra Mantralaya Reopen Again For Public : आजपासून (बुधवारपासून) मंत्रालायात सर्व सामान्यांन्य नागरिकांनाही प्रवेश दिला जाणार आहे.
Ordinary citizens will now get admission in the ministry of Maharashtra with a pass
Ordinary citizens will now get admission in the ministry of Maharashtra with a passसुमित सावंत

मुंबई: सर्वसामान्य नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. शासकीय कामांसाठी आता सर्वसामान्य नागरिकांसाठी मंत्रालयाचे (Mantralaya) दरवाजे खुले झाले आहे. त्यामुळे आता रखडलेली शासकीय कामे करण्यासाठी सर्वांना मंत्रालयात प्रवेश (Entry) दिला जाणार आहे. गृहविभागाने हा निर्णय जाहिर केला आहे. १८ मार्च २०२० पासून मंत्रालयात सर्वसामान्य नागरिकांना कोरोनामुळे प्रवेश बंद (No Entry) करण्यात आला होता. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची (Corona) लागण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. (Ordinary citizens will now get admission in the ministry of Maharashtra with a pass)

हे देखील पाहा -

सध्या देशासह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या घटली असून कोरोना आटोक्यात आला आहे. राज्यात कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे आजपासून (बुधवारपासून) मंत्रालायात सर्व सामान्यांन्य नागरिकांनाही प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे आजपासून मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर व्हिजिटर्स पास मॅनेजमेंट सिस्टीम सुरू करण्यात येणार आहे. दुपारच्या सत्रात पास घेऊन सर्वसामान्यांना मंत्रालायत प्रवेश देण्यात येईल. या निर्णयामुळे रखडलेली प्रशासकीय कामे पुर्ण करण्यासाठी नागरिकांना कार्यालयीन वेळेत मंत्रालयात प्रवेश मिळाल्याने त्यांना दिलासा मिळणार आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com