10th SSC Result Saam Tv
महाराष्ट्र

10th SSC Result: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट, निकालाआधी बोर्डाने दिली महत्त्वाची माहिती

10th SSC Result Board Update: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाने महत्त्वाची अपडेट दिली आहे. दहावीचा निकाल कधी लागणार याबाबत माहिती आता समोर आली आहे.

Siddhi Hande

दहावीचा निकाल कधी लागणार असा प्रश्न सर्व विद्यार्थ्यांना पडला आहे. दहावीचे वर्ष हे विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे निकालाआधी मुलांच्या मनात धाकधुक निर्माण होते. दहावीचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत बोर्डाने कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र, बोर्डाने निकालाआधी महत्त्वाची माहिती दिली आहे. दहावीच्या परीक्षेसाठी या वर्षी किती विद्यार्थी बसले होते याबाबत बोर्डाने माहिती दिली आहे. (10th SSC Result)

१६ लाख विद्यार्थ्यांनी दिली दहावीची परीक्षा

२०२४-२५ या वर्षात एकूण १६ लाख विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन केले होते.मागच्या वर्षी २०२४ मध्ये १५,४९,३२६ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेच्या बसले होते. मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी जास्त विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. दहावीची मुंबई, पुणे, नागपूर, कोकण येथे परीक्षा घेण्यात आली होती.प्रात्यक्षिक परीक्षा ३ ते २० फेब्रुवारी या काळात झाली होती. त्यानंतर लेखी परीक्षा घेण्यात आली होती.

मागच्या वर्षीचा रिझल्ट

मागच्या वर्षी दहावीचा निकाल ९५.८१ टक्के लागला होता. यात मुली अव्वल आल्या होत्या. कोकण विभागाने पहिला नंबर पटकावला होता. दरम्यान, यावर्षी दहावीचा निकाल कसा लागणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

दहावीचा निकाल कसा चेक करायचा?

दहावीचा निकाल चेक करण्यासाठी दरवर्षी बोर्ड वेबसाइट जारी करते.mahahsscboard.in

mahresult.nic.in

msbshse.co.in

mh-ssc.ac.in

sscboardpune.in या वेबसाइटवर जाऊन तुम्ही रिझल्ट पाहू शकता. याचसोबत डिजिलॉकरवरुनदेखील निकाल डाउनलोड करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banarasi Kurta Design: लग्नसराई ते डेली वेअरसाठी ट्राय करा हे ७ ट्रेंडी लेटेस्ट बनारसी कुर्ते

World Cup 2026 final : फायनलआधी टीम इंडियाचा मोठा निर्णय, २०२३ च्या कटू आठवणीमुळे बदल?

Success Story: आई-बाप फक्त दहावी पास, पण लेकीला सरकारी अधिकारी केलं; मालेगावच्या प्रेरणाची UPSCत भरारी, वाचा सक्सेस स्टोरी

DCM Plane News : उपमुख्यमंत्री मौर्य यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग, केबिनमध्ये धुराचे लोट अन्...

Silver Rate: तीन दिवसात तीस हजारांनी चांदी स्वस्त, लग्नसराईआधी ग्राहकांना दिलासा, वाचा ताजे दर

SCROLL FOR NEXT