Silver Rate: तीन दिवसात तीस हजारांनी चांदी स्वस्त, लग्नसराईआधी ग्राहकांना दिलासा, वाचा ताजे दर

Silver Price Today: फक्त तीन दिवसांत चांदीच्या किमतीत तब्बल 30 हजार रुपयांची घसरण झाली आहे. लग्नसराईच्या हंगामाआधी ग्राहकांना दिलासा मिळाला असून जागतिक बाजारातील घडामोडींमुळे दरात चढ-उतार सुरू आहेत.
Silver Rate Today
Silver RateSaam Tv
Published On

सध्या लग्नसराईला काहीच महिने शिल्लक राहीले आहेत. एप्रिल- मे महिना म्हणजे लग्नाची धामधुम असते. त्यासाठी सगळ्यात आधी खरेदी केली जाते ती म्हणजे दागिन्यांची. दागिन्याच्या किमती मागच्या काही महिन्यात किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळाली होती. मात्र आता यात मोठे बदल झालेले पाहायला मिळतायेत. सर्वसामान्यांना याचा विशेष आनंद होणार आहे. कारण चांदीच्या किमतीत गेल्या तीन दिवसात मोठे बदल झाले आहेत.

Silver Rate Today
RBI Note Rules: होळीच्या रंगामुळे नोटा खराब झाल्या तर काय करावे? RBIचे नवे नियम वाचाच

भारतात सोने-चांदीच्या किमतीत कमी होताना पाहायला मिळाली आहे. विशेष म्हणजे फक्त तीन दिवसांत चांदीच्या दरात तब्बल 30 हजार रुपयांची घट झाल्याने बाजारात मोठी चर्चा सुरू आहे. एप्रिल-मे महिन्यात देशभरात लग्नसराईचा हंगाम सुरू होतो.

सध्या देशातील सराफा बाजारात चांदीच्या किमती स्थिर दिसत असल्या तरी मागचे काही दिवस झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांचे लक्ष या बाजाराकडे लागलेलं पाहायला मिळतयं. त्यात गेल्या तीन दिवसांमध्ये 30,000 रुपयांनी चांदी कमी झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

आज चांदीचा दर हा 285 रुपये प्रति ग्रॅम तर 2,85,000 रुपये प्रति किलो इतका आहे. यामध्ये मागील दिवसांच्या तुलनेत कमी प्रमाणात चढ-उतार दिसत आहे. तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडींचाही मौल्यवान धातूंच्या किमतीवर मोठा परिणाम होताना दिसत आहे. जागतिक बुलियन मार्केटमधील ट्रेंड, अमेरिकन डॉलरची स्थिती, महागाईबाबतच्या अपेक्षा आणि जिओपॉलिटिकल तणाव या सगळ्यामुळे सोने-चांदीच्या किमतीत दररोज बदल होताना पाहायला मिळत आहेत. मिडल ईस्टमधील तणाव आणि डॉलरमधल्या चढ-उतारामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोने-चांदीकडे वळत आहेत.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्येही सोन्या-चांदीच्या फ्युचर्समध्ये हालचाल दिसून आली. एप्रिल गोल्ड फ्युचर्समध्ये वाढ नोंदवली गेली आहे. त्यामुळे मे महिन्याच्या चांदीच्या फ्युचर्समध्येही काही प्रमाणात तेजी दिसली आहे. तज्ज्ञांच्या मते, छोट्या-मोठ्या चढ-उतारांनंतरही सोने आणि चांदी हे भारतीयांसाठी सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय मानला जात आहे.

सण-उत्सव आणि लग्नसराईच्या काळात दागिन्यांच्या खरेदीसाठी या सोने-चांदीची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते. त्यामुळे या दिवसांमध्ये चांदीच्या किमतींत वाढ होणार की दर गडगडणार?याकडे गुंतवणूकदार आणि ग्राहक दोघांचंही लक्ष लागलं आहे. पुढील काही दिवसांत जागतिक बाजारातील संकेतांनुसार चांदीच्या किमतीत आणखी चढ-उतार दिसू शकतो.

Silver Rate Today
BP Medicine Effect: BP च्या गोळ्या घेऊनही रक्तदाब कमीच होत नाहीये? दुर्लक्ष करू नका, असू शकतो 'हा' गंभीर आजार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com