HSC SSC Result: बारावीचं ठरलं, दहावीचा निकाल कधी जाहीर होणार? महत्वाची अपडेट आली समोर

SSC HSC Exam Result 2025: बारावीचा निकाल ५ मे रोजी जाहीर होणार असल्याचं निश्चित झालं आहे. मात्र, दहावीच्या निकालाची प्रतिक्षा अजूनही कायम आहे.
SSC HSC Result 2025
SSC HSC Result 2025Saam tv
Published On

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी आणि बारावीचा निकाल कधी जाहीर होणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. दहावी आणि बारावीच्या निकालाची विद्यार्थ्यांसह पालकांनाही उत्सुकता लागली आहे. बारावीचा निकाल ५ मे रोजी जाहीर होणार हे निश्चित झालं. पण दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल कधी जाहीर होणार? याच्या प्रतिक्षेत प्रत्येक पालक आणि विद्यार्थी वर्ग डोळे आस लावून बसले आहेत.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2025 दरम्यान दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेतल्या होत्या. सध्या या परीक्षांचे निकाल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, बारावीचा निकाल ५ मे रोजी जाहीर होणार असल्याची माहिती बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे. दुपारी १ वाजता आपल्याला अधिकृत साईटवर निकाल पाहता येणार आहे.

SSC HSC Result 2025
CRPF Jawan: व्हिडिओ कॉलद्वारे पाकिस्तानी महिलेशी गुपचूप लग्न, भारतीय जवानाला सेवेतून तातडीने बडतर्फ

दरम्यान, दहावीचा निकाल कधी जाहीर होणार, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, दहावीचा निकाल ८ दिवसांनी लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. १२ मे ते १५ मे दरम्यान, दहावीचा निकाल जाहीर होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. निकाल जाहीर करण्यापूर्वी मंडळाकडून पत्रकार परिषद घेण्याची शक्यता असून, त्यावेळी निकालाची अचूक तारीख आणि वेळ जाहीर करण्यात येईल.

SSC HSC Result 2025
Crime: खोलीतून ओरडण्याचा आवाज, तरूणी अर्ध नग्न अवस्थेत आढळली; बॉयफ्रेंडने नेमकं काय केलं?

मार्च महिन्यात परिक्षा संपल्यानंतर आता विद्यार्थी आणि पालक निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. बारावीच्या निकालाबाबत अधिकृत माहिती समोर आलेली आहे. मात्र, दहावीच्या निकालाबाबत कोणतीही अधिकृत तारीख घोषिक करण्यात आलेली नाही.

SSC HSC Result 2025
12th Board: सस्पेन्स संपला! १२वीचा निकाल उद्या लागणार, पण किती वाजता? कसा पाहायचा? VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com